नगर : मर्चन्ट बँकेसाठी 26 फेब्रुवारीला मतदान; उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात | पुढारी

नगर : मर्चन्ट बँकेसाठी 26 फेब्रुवारीला मतदान; उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर शहरातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या अहमदनगर मर्चन्टस् को-ऑप. बँक लि अहमदनगर या बँकेची पंच वार्षिक निवडणूक जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी जाहीर केली. 24 फेब्रुवारीपासून अर्जभरण्यास सुरूवात होणार असून, 26 रोजी विविध ठिकाणी मतदान होणार आहे. सहकारी संस्था, बँका, पतपेढ्या यांच्या निवडणुका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या 13 डिसेंबर 2022 रोजीच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या निवडणुका घेण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यानुसार नगर शहरासह जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या अहमदनगर मर्चन्टस को-ऑप. बँक. लि. या बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे.

सहकारी संस्थांच्या अधिनियमणाप्रमाणे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मर्चन्टस् बँकेसाठी 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यात सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती, महिला, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमाती अशा जागा आहेत. 24 ते 31 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करणची मुदत आहे.

तर, 1 फेबु्रवारी 2023 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून 2 फेब्रुवारीला वैध अर्जाची यादी निवडणूक कार्यालय व संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्धी करण्यात येईल. 2 ते 16 फेब्रवारी रोजी दुपारीपर्यंत अर्ज माघार घेण्यास मुभा असेल. 17 फेब्रुवारी रोजी चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल.(स्थळनंतर घोषीत करण्यात येणार आहे) 27 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी गणेश पुरी यांनी सांगितले.

Back to top button