नगर : सहा महिन्यांचे थकलेले पगार द्या; रुग्णवाहिका चालक आक्रमक

नगर : सहा महिन्यांचे थकलेले पगार द्या; रुग्णवाहिका चालक आक्रमक
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 102 क्रमांकाच्या रुग्णवाहक वाहनचालकांचे सहा महिन्यांचे पगार थकलेले आहे. या संदर्भात वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाचे लक्ष जात नसल्याने काल सकाळी 11 वाजता आपल्या विविध मागण्यांसाठी झेडपीच्या दालनात रुग्णवाहिका चालकांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांचे निवेदनाव्दारे लक्ष वेधण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या अधिकाराखाली असणार्‍या आरोग्य विभागातील कंत्राटी 102 रुग्णवाहिका वाहन चालकांचे मागील सहा महिन्यांचे थकीत वेतन कंत्राटदाराकडे बाकी आहे. नगरमध्ये जिल्हा परिषदेचे जवळपास 98 प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यासाठी 98 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यावर तेवढेच कंत्राटी वाहन चालक कार्यरत आहेत. पूर्वीच्या कंत्राटदाराने (मे.अष्टविनायक ट्रॅव्हल्स व ईश्वर ट्रॅव्हल्) यांनी देखील वाहन चालकांचे तीन महिन्याचे वेतन थकीत ठेवलेले असल्याने, वाहन चालकांना अनियमितपणे केलेले वेतन आणि वाहन चालकांच्या वेतनात केलेल्या दिरंगाईमुळे आपल्या विभागाने त्याला हटवून नवीन ठेकेदाराची नेमणूक केली.

ज्यामुळे या 98 वाहन चालकांचे व्यवस्थित व वेळेत वेतन मिळेल, असे अनुमान होते,परंतु या नव्याने कंत्राट दिलेल्या (मे.दृष्टी सिक्युरिटी व प्रसनल सर्विसेस जळगाव व विंसोल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे )या कंपनीने देखील पूर्वीच्या कंत्राटदारा प्रमाणेच वाहनचालकांच्या वेतनात दिरंगाई केली. त्यामुळे त्या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करून मागील पाच महिन्याचे सर्व वाहनचालकांचे वेतन तत्काळ अदा करावे, अन्यथा सर्व वाहन चालकास घेऊन संघटनेच्या वतीने आरोग्य अधिकारी यांच्या दालनात आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही देण्यात आला.

यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, विजय मिसाळ, राहुल शिवशरण, बापूसाहेब वाघमोडे, सुधाकर खरात, बी.जी लांडगे, विकास जठर, दत्तात्रेय गवळी, एस.पी कसबे, दत्तात्रेय गायके, सौरव जाधव, माणिक निकम, शिवाजी देवकर, विजय दराडे, सय्यद फिरोज, पंकज खपके, सोमा येवले, संभा चव्हाण, जेम्स ससाने, बाबासाहेब नाईक, शंकर जाधव, अनिल हिगडे, अनिल गायकवाड, सुभाष नाईक, किरण गोरे, काशिनाथ नरवडे, साहेबराव थोरात, विनोद घुले आदीसह रुग्णवाहक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news