नगर : हिंदू राष्ट्रच्या घोषणेने परिसर दणाणला

नगर : हिंदू राष्ट्रच्या घोषणेने परिसर दणाणला

Published on

नगर : पुढारी वृत्तसेवा : जय श्रीराम… छत्रपती शिवाजी महाराज जय… धर्मवीर संभाजी महाराज की जय… जयतुजयतु हिंदू राष्ट्र… पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विजय असो… हर हर महादेव अशा घोषणांनी सावेडीतील जॉगिंग ट्रकचा परिसर दणाणून गेला. हिंदू जनजागृती सभेसाठी महिला, तरुण, हिंदूप्रेमींनी अलोट गर्दी केली होती. शहरातील जॉगिंग ट्रॅकवर हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित सभेत वक्त्यांनी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी जागर केला. व्यासपीठावर हिंदू जनजागृतीचे सुरेश चव्हाणके, सनातन धर्म सभेचे नंदकुमार जाधव, रणरागिनी राजेश्री देशपांडे, हिंदू जनजागृतीचे संघटनेचे सुनील घनवट आदी उपस्थित होते. तर, सनातन धर्म सभा, हिंदू राष्ट्र जनजागृती समिती, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आदींसह विविध संघटना, राजकीय पक्षातील हिंदू प्रेमी कार्यकर्त्यांनी सभेला हजेरी लावली होती. या सभेमध्ये सर्वच वक्त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या. लव्ह जिहाद प्रतिबंधक कायदा करावा, धर्मातर बंदी कायदा करावा, गोहत्या रोख कायदा करावा, गडकिल्ल्यांवरील मजारी हटवाव्यात, छत्रपती शिवाजी महाराज की जय न म्हणार्‍याला महाराष्ट्रद्रोही ठरवावे.

औरंगजेब व टिपू सुलतान जयंती साजरी करणार्‍यांना शिक्षा करा, अशा मागण्या राज्य सरकारकडे केल्या. तर, मुस्लिमांचा अल्पसंख्याक दर्जा काढून टाकावा, जनसंख्या नियंत्रण कायदा आणावा, हिंदुस्थानला हिंदू राष्ट्र घोषीत करावे, अशा मागण्या केल्या. तर, जिहाद्यांवर आर्थिक बहिष्कार टाकावा, भारत माता की जय न म्हणार्‍यांकडून काहीच खरेदी करू नका, आई-बहिणीची इज्जत जपा, कोणत्या पक्षात राहा मात्र, धर्माचे राजकारण करू नका. हिंदू धर्मासाठी एकत्र यावा, असे आवाहन केले. दरम्यान, पोलिसांनी सभास्थळी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

आमचं नगर अहिल्यानगर !
संपूर्ण जागिंग ट्रक परिसरात आणि मैदानावर भगवे झेंडे लावण्यात आले होते. तरुणांच्या गळ्यात भगवे पंचे आणि हातात भगवे झेंडे होते. महिलांची संख्याही उल्लेखनीय होती. गर्दीमधून आमच नगर अहिल्यानगर अशा घोषणांचाही उपस्थितांच्या लक्ष वेधून घेत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news