नगर : कुरणला पोलिसांकडून 5 जनावरांची मुक्तता

नगर : कुरणला पोलिसांकडून 5 जनावरांची मुक्तता

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील कुरण येथे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या पाच वंश जनावरांची संगमनेरशहर पोलिसांनी कत्तलीतून मुक्तता केली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील कुरण येथील इरफान शेख यांच्या घराच्या बाजूला कत्तलीच्या उद्देशाने जनावरे बांधून ठेवले असल्याची गुप्त माहिती खब-यामार्फत संगमनेर शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना समजली.

त्यानंतर संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने कुरण या गावात जाऊन कत्तली च्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या सुमारे 50 हजार रुपये किमतीच्या 5 गोवंश जनाव रांची कत्तलीतून मुक्तता केली याबाबत पो ना सचिन उगले यांन शहरपोलीसठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी असलम बालम शेख रा कुरण यांच्या विरो धात प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करत यास अटक केलीआहेपुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरी क्षक निवांत जाधव हे करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news