नगर : नवनिर्वाचित पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये !

नगर : नवनिर्वाचित पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये !

करंजी : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्यांनी गावातील पथदिवे दुरुस्ती, मुख्य पाईपलाईनची गळती बंद करणे, हातपंपाची दुरुस्ती, त्याचबरोबर बाजारतळ परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत त्याची तात्काळ सोडवणूक करून घेतलेली अ‍ॅक्शन मोडची भूमिका गावात चर्चेचा विषय ठरली आहे. सरपंच इलियास शेख, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब लवांडे, उपसरपंच संगीता गारुडकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर, माजी पं सं. सदस्य सुनील परदेशी, ज्येष्ठ नेते लतीफ शेख, पैलवान आरिफ तांबोळी, शबाना शेख, सिकंदर शेख, अमोल भडके, अमोल गारुडकर यांच्यासह सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन तेथील मूलभूत समस्यांना प्राधान्य देत त्या तत्काळ सोडविण्याचे धोरण आखल्याने हा उपक्रम गावात चर्चेचा विषय ठरला आहे.

गावातील मुख्य पाईपलाईनला ठिकठिकाणी असलेली गळती तत्काळ दुरुस्त करुन गावाला नियमित पाणीपुरवठा करण्याला पहिले प्राधान्य दिले. त्यानंतर वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या आठवडे बाजार परिसरातील संपूर्ण ओटे परिसर स्वच्छ करुन वाहतूक कोंडी दूर केली जात आहे. गावातील संपूर्ण पथदिवे दुरुस्ती करून ठिकठिकाणी नवीन दिवे बसविले आहेत. गावातील हातपंपाची तत्काळ दुरुस्ती करण्यात आली आहे. असे मूलभूत प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. सत्ताधारी गटाने सुरू केलेले हे अभियान गावकर्‍यांना देखील चांगले भावणारे ठरले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news