नगर : जीव मुठीत धरून मुले गिरवितात धडे ; जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था

शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान
शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील बुरडगाव शाळेमध्ये सर्व 12 वर्ग खोल्या या अतिशय जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याने या ठिकाणी अक्षरशः लहान मुले आणि त्यांना ज्ञानदान करणारे शिक्षकही जीव मुठीत धरून बसत असल्याचे पुढे आले आहे. नुकतीच अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांनी या शाळेची पाहणी करतानाच लवकरात लवकर शाळा खोल्यांचा प्रश्न कसा सोडवता येईल, बाबत प्रयत्न करू, असे सांगितले.

जिल्हा परिषद शाळा बुरुडगाव येथे अधिकार्‍यांच्या निर्लेखनाच्या खेळापाई मागील तीन वर्षांपासून 127 विद्यार्थी भयभीत अवस्थेत शिक्षण घेत आहेत. या शाळेवर पाच शिक्षक असून मुलांना बसण्यासाठी पाच आणि मुख्याध्यापकासाठी एक अशा सहा वर्ग खोल्याची गरज आहे. परंतु यासाठी केवळ दोन वर्ग खोल्या मंजूर असून यामध्ये देखील एक मोठी अडचण आहे, ती निर्लेखनाची. जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच शिक्षण विभागाच्या नियमानुसार पूर्वीच्या पाच वर्ग खोल्या आहेत. त्यांच निर्लेखन (पाडून )करून त्या नंतर मंजूर असलेल्या दोन खोल्या बांधण्यात येतील. जवळपास नऊ वर्ग खोल्या पाडण्याच्या स्थितीत आहेत. म्हणजे एकूण 12 उपलब्ध असलेल्या खोल्यांपैकी तीन वर्ग खोल्यांमध्ये बसण्यास योग्य आहेत. परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी पाच वर्ग भरत आहेत.

ही सर्व बाब लक्षात घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांनी शाळेच्या परिसराची पहाणी करुन याबाबत विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसवू नये, त्यांची पर्यायी जागेत वर्ग भरवावेत, अशा मुख्याध्यापकांना सूचनाही केल्या.  यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, गट शिक्षणाधिकारी बापूराव जाधव, नगर तालुका जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आजिनाथ खेडकर, उपअभियंता शिवाजी राऊत आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news