नगर :  तारकपूर बसस्थानकातून तीन गावठी कट्टे जप्त

नगर :  तारकपूर बसस्थानकातून तीन गावठी कट्टे जप्त
Published on
Updated on

नगर :  पुढारी वृत्तसेवा :  तारकपूर बसस्थानकातील मोटारसायकल पार्किंगजवळ गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणलेल्या एकाला एलसीबीच्या पथकाने गजाआड केले. 94 हजार 600 रूपये किमतीचे तीन कट्टे व नऊ जिवंत काडतुसे आरोपीकडून हस्तगत करण्यात आली असून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (दि.23) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मुकेश रेवसिंग खोटे उर्फ बरेला (रा. खुरमाबाद, ता. सेंदवा, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तारकपूर बसस्थानकाजवळ गावठी कट्ट्यांची विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती खबर्‍याकडून एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे पथक बसस्थानकाजवळील मोटारसायकल पार्किंजवळ सापळा लावून थांबले असता पाठीवर काळ्या रंगाची सॅक असलेला संशयीत पोलिसांना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढला.

मात्र, एलसीबीच्या पथकाने आरोपीचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एका सॅकमध्ये तीन गावठी बनावटीचे कट्टे व नऊ जिवंत काडतूस मिळून आल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, हेड कॉन्स्टेबल देवेंद्र शेलार, सुरेश माळी, संदीप घोडके, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, रविंद्र घुंगासे, मयुर गायकवाड, चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. सहायक फौजदार राजेंद्र देवमन वाघ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यप्रदेशातून नगरमध्ये विक्री

गावठी कट्टे मध्यप्रदेशातून विक्रीसाठी आणल्याचे ताब्यात घेतलेल्या आरोपीने सांगितले. पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी शेख शहानवाज ख्वाजा (रा.केडगाव) याला कट्टे विक्री करण्यासाठी आणल्याची कबूली त्याने दिली.

पंधरा दिवसापूर्वी दोन कट्ट्यांची विक्री

गुन्हेगारांची वाढती पिलावळ पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहे. शहरात सर्रास गावठे कट्टे विक्री होत आहेत. गत पंधरा दिवसापूर्वी देखील दोन कट्टे शहरात विक्री केल्याचे आरोपीने कबूली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्याद्यांचे वजीर बनून गेम

शहरातील वातावरण गत काही दिवसांपासून नानाविध कारणांमुळे गरम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशात सर्रास होत असलेली गावठी कट्ट्यांची विक्री धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. प्याद्यांच्या वजिरांकडून हे सर्व घडवून आणल्या जात असल्याची चर्चा शहरात आहे. अशात पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडून ठोस अशी कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नगरकरांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news