युवकाच्या शोधासाठी राबवलं गेलं नाणेघाट सर्च ऑपरेशन ; तब्बल १२०० फुट खोल दरीतून काढला मृतदेह वर | पुढारी

युवकाच्या शोधासाठी राबवलं गेलं नाणेघाट सर्च ऑपरेशन ; तब्बल १२०० फुट खोल दरीतून काढला मृतदेह वर

पुढारी वृत्तसेवा : लोणी येथील बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह शोधून काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आलं आहे. नाणे घाटातील एका खोल दरीत हा मृतदेह आढळून आला. मनेश गोरख जठार (मु.पो.लोणी व्यकंनाथ) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा युवक दिनांक 11 जानेवारीपासून राहत्या घरामधून बेपत्ता होता. पोलिसांनी शोध घेतला असता त्याची गाडी व शेवटचे लोकेशन नाणे घाट मध्ये 12 जानेवारीला मिळाले. पोलिसांनी नाणेघाटातील सर्व ठिकाणी स्वतः व वेगवेगळ्या ट्रेकिंग ग्रुपमार्फत शोध घेतला परंतु कुठल्याही प्रकारची ठोस माहिती मिळत नव्हती. दरम्यान शिवदुर्ग या ट्रेकिंग आणि रेस्क्यू संस्थेकडे मदतीसाठी फोन आला. दुसऱ्या दिवशी दरीतून रेस्क्यू ऑपरेशन करण्याचे ठरले. टीमने टॉर्च, वॉकी , कॅमेरा, टेक्नीकल व साहित्य, व बॉडी पॅकिंगसाठी साहित्य बरोबर घेतले सकाळी 5.30 ला टिम जुन्नरच्या दिशेने निघाली.

साधारणत: .३० वाजता कामाला सुरुवात झाली. सुरवातीला योगेश उंबरे एक हजार फुट खाली दरीमध्ये रॅपलींग करुन गेला . नंतर सिध्दार्थ आढाव मदतीला गेला. संशयास्पद वाटणाऱ्या खाणाखुणा शोधल्या जे स्पष्ट पांढऱ्या रंगाचे दिसत होते ती बॉडी नव्हती. पण जवळच एक मार्क होता त्याला फॉलो केल्यामुळे एक काळी पॅन्ट व ओळखपत्र सापडले. त्यामुळे तपासाला दिशा मिळाली. पॅन्ट मुलांची आही ही खात्री पटल्यावर आणखी शोधाशोध सुरू केली. त्याच लाईन मध्ये खाली शर्ट सापडला व नंतर बॉडी दिसू लागली. रोप कमी असल्यामुळे तिथपर्यंत जाता येत नव्हते.

मृतदेह पॅकिंगसाठी मेडीकल ग्लोज, प्लास्टिक, स्ट्रेचर ,रोप, खाणे पिणे साहित्य हे सर्व घेऊन रतनसिंग याला खाली पाठवले . मृतदेह खाली गावात घेऊन जाता येईल का ? कि वर खेचून घेणे सोपे जाईल यावर स्थानिक लोकांशी चर्चा केली व अंतर मोठे असल्याने दोन टप्प्यांत वर ओढून घेण्याचे ठरले व सगळी जुळवाजुळव करुन अथक परिश्रमाने मृतदेह ठिक 04.00 वाजता वर आणला गेला. बॉडी खेचून घेण्यासाठी स्थानिक नागरिक, मृतांचे नातेवाईक, पोलीस, अधिकारी, व टिमचे मोलाचे सहकार्य लाभले. शिवदुर्ग टीम आणि स्थानिक यांची या कामी मदत झाली

 

Back to top button