

नगर : पुढारी वृत्तसेवा : ओ हुरर… ओय काप्या… काप्या रे… ओय कटला.. कटला… अशा आवाजांनी आणि साउंड सिस्टीमने सर्व शहर दणाणून गेले होते. इमारतीच्या प्रत्येक गच्चीवर तरुणाई थिरकताना दिसत होती. तर, सुवासिनीनी शहरातील विविध मंदिरामध्ये पूजेसाठी गर्दी केली होती. कोविड महामारीनंतर पहिल्यांदाच मकरसंक्रांत सण उत्साहात साजरा झाला. गेल्या सहा दिवसांपासून शहरात पंतग व दोर्याची दुकाने लागली होती. शनिवारी व रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने अनेकांनी शनिवारीच बाजारातून पतंग खरेदी केले होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासून अबालवृद्धांनी इमारतीच्या गच्चीवर आपली जागा फिक्स केली होती. सावेडी उपगर, बोल्हेगाव, केडगाव, माळीवाडा, तोफखाना, बुरूडगाव रोड, सारसनगर आदी भागात तरुणाई मोठ्या प्रमाणात पतंग उडविताना दिसत होती. आकाशात नुसत्या पतंग दिसत होत्या. अधून मधून काप्या रे… काप्या रे… असा आवाज येता होता. संपूर्ण दिवस तरुणाईने गाण्याच्या तालावर थिरकत पतंग उडविण्याचा आनंद घेतला.
पतंगाच्या किमतीत वाढ
दिवस मुले पतंग उडविण्याचा आनंद घेत होते. त्यामुळे किरकोळ विक्रीवर पतंगाच्या किमती वाढल्या होत्या. दहा रुपयांपासून ते चाळीस रुपयापर्यंत पतंगाची विक्री सुरू होती. पतंग विक्रीच्या दुकानावर गर्दी दिसत होती.
मांजाची सर्रास विक्री
पोलिसांनी छापे मारी करून चायना व नायलॉन मांजा जप्त केला. परंतु, तरीही आज चुप्या मार्गाने चायना व नायलॉन मांजाची विक्री सुरू होती.
कुटुंबाने घेता पतंग उडविण्याचा आनंद
मकरसंक्रात म्हटल की चिमुकल्यांची घाईगडब असते ती पतंग उडविण्यासाठी. पण त्यांना पतंग उडविता येत नसल्याने कुटुंंबातील मोठ्या व्यक्तीकडे हट्ट धरतात. त्यामुळे आज अनेक इमारतीच्या गच्ची सहकुटुंब पतंग उडविताना दिसले.
फटक्यांची आतषबाजी
सायंकाळी सावेडी उपगनगरामध्ये प्रत्येक इमारतीच्या गच्चीवर तरुणाई पतंग उडविण्याचा आनंद घेत होती. एका बाजूला ढोल ताशा, साउंड सिस्टीम आणि डान्स सुरू होता. तर, सायंकाळी पतंगाबरोबर फटाक्यांची आतषबाजी पहायला मिळाली.