कर्जत : महाराष्ट्राला तिसर्‍या क्रमांकावर समाधान; रोहतक विद्यापीठ द्वितीय, स्पर्धेचा उत्साहात समारोप | पुढारी

कर्जत : महाराष्ट्राला तिसर्‍या क्रमांकावर समाधान; रोहतक विद्यापीठ द्वितीय, स्पर्धेचा उत्साहात समारोप

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत पंजाब गुरुनानक देव विद्यापीठाचे वर्चस्व, रोहतक विद्यापीठ द्वितीय, तर कोल्हापूर विद्यापीठ तृतीय. सर्वसाधारण विजेता पंजाबच्या गुरुनानक देव विद्यापीठाने पटकाविली. कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत पंजाबच्या महिला कुस्ती खेळाडूंनी वर्चस्व प्रस्थापित केले. यजमान महाराष्ट्राला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्यातर्फे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सोमवारी (दि. 9) 68 किलो व 76 किलो वजनी गटातील कुस्त्या झाल्या.

68 किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेती अर्जू (छत्रपती देविलाल विद्यापीठ, सिरसा), रौप्यपदक विजेती राधिका (गुरूनानक देव विद्यापीठ, अमृतसर)ब्राँझ विजेती भूमी (चंदीगढ विद्यापीठ, मोहाली) शेजल मौर्य (जौनपूर विद्यापीठ, कोल्हापूर) यांना पदके पटकाविली. 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेती प्रिया (गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर), रौप्यपदक विजेती कीर्तिका (हिमाचल प्रदेश विद्यापीठ, शिमला), ब्राँझपदक विजेती अंकिता (महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर) व बिपाशा (चित्कारा विद्यापीठ, राजपूरा-पंजाब) यांनी पदके पटकाविली. 68 व 76 किलो वजनी गटातील सुवर्ण, रौप्य व ब्राँझपदक विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेमध्ये जनरल चॅम्पियन पंजाब विद्यापीठाने 173 गुण मिळवून पटकाविली, रोहतक येथील दयानंद विद्यापीठाने 109 द्वितीय, तर कोल्हापूर विद्यापीठाने 70गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.

लव्हली पेहेज वारा विद्यापीठाने 63 गुणांसह चौथा क्रमांक पटकाविला. पदक विजेत्या स्पर्धकांच्या सत्कार सोहळ्याला राजेंद्र फाळके, अंबादास पिसाळ, नामदेव राऊत, बाळासाहेब साळुंके, राजेंद्र गुंड, प्रा. दीपक माने, प्रसाद ढोकरीकर, काकासाहेब तापकीर, अनिल तोरडमल, सुनील शेलार, विकास राळेभात, निखील घायतडक, पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र तनपुरे, अतुल पाटील, आप्पासाहेब फाळके, किरण पाटील, आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती खेळाडू शबनम शेख, उमेश परहर, खोसे, रघुआबा काळदाते, अण्णासाहेब महानोर, अ‍ॅड. सुरेश शिंदे, लालासाहेब शेळके, केशव अडसूळ, रंगनाथ सुपेकर, बाळासाहेब सपकाळ, किशोर अडसूळ, ज्ञानदेव पाबळे, आश्रूमामा शेळके, नितीन हुलगुंडे, नीलेश दिवटे, प्रवीण तापकीर, वैभव बाबर, राहूल जगताप, संतोष म्हेत्रे, ऋषिकेश धांडे, अतुल धांडे, सचिन मांडगे, नीलेश तनपुरे, अजित वांगडे, दिलीप जाधव, वसंत कांबळे, संजय सुद्रिक, किरण पावणे, विजय कोपनर, देविदास खरात, सतीश शेटे, डॉ. दीपाली जोगदंड, डॉ. सुनंदा चिखले, डॉ. स्नेहल शिंदे, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थितीत पदकविजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे निमंत्रक राजेंद्र फाळके, आमदार रोहित पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर, बप्पाजी धांडे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, स्पर्धा संयोजक डॉ. संतोष भुजबळ, प्रा. शिवाजी धांडे यांनी उपस्थित सर्व कुस्तीप्रेमींचे आभार मानले. प्रा. राम काळे व प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button