सोनई : कौतुकी नदी बनली कचराकुंडी परिसरात दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

सोनई : कौतुकी नदी बनली कचराकुंडी परिसरात दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सोनई; पुढारी वृत्तसेवा : येथील कौतुकी नदीत व्यापार्‍यांनी कचरा, खराब भाजीपाला, फळे, वस्तू, प्लॅस्टिक पिशव्या टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानक ते लांडेवाडी रस्त्यावरील नदीच्या दोन्हीही बाजूंचे मोजकेच लहान मोठे व्यापारी ही घाण टाकत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. मारूती मंदिर परिसरातील नदीजवळ जास्तच कचरा साचल्याने अस्वच्छता पसरून दुर्गंधी पसरत आहे. डास व माशांचे प्रमाण वाढत आहे. तेथेच भाजीपाला विक्रेते व खाद्यपदार्थाचे स्टॉल लागत असल्याने त्यावर हे डास व माशा बसत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. प्रशासनाने नदीत खराब झालेले फळे, भाजीपाला, कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने कौतुकी नदीचे सुशोभीकरण करीत वृक्षारोपण, लहान मुलांसाठी खेळण्या व नदीवरील पुलावर बल्ब लावले नाहीत. ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारायला व लहान मुले खेळण्यासाठी म्हणून परिसरात येत होते. पण काही टवाळखोरांनी रात्रीतून खेळण्या व बल्ब फोडले, सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर चोरून नेले स्वामी विवेकानंद चौकातून मारुती मंदिराकडे येण्यासाठी रात्रीतून रस्ताही तयार झाला व मंदिर परिसरात अवैद्य व्यवसायाला रात्रीतून उत येण्यास सुरुवात झाली आहे, तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

Back to top button