नगर : सप्टेंबरचे धान्य मिळणार नोव्हेंबरला : तहसीलदार शिवकुमार आवळकंठे | पुढारी

नगर : सप्टेंबरचे धान्य मिळणार नोव्हेंबरला : तहसीलदार शिवकुमार आवळकंठे

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांतील लाभार्थ्यांना सप्टेंबरमध्ये धान्य मिळाले नव्हते. डेटा, ई-पॉस मशीनवर ते दिसत नव्हते. त्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरच्या पर्यायामधून सप्टेंबरचे धान्य वाटप करण्यास परवानगी दिल्याची माहिती तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.  तहसीलदार आवळकंठे यांनी दिेलेल्या आदेशात म्हटलेे की, जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रानुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे नियतन स्थगित करावे, तसेच सद्यस्थितीत चलन परमिट पूर्ण होऊन स्वस्त धान्य दुकानांपर्यंत वाहतूक पूर्ण झाली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांंचे वितरण ऑप्शन ई-पॉस मशीनवर उपलब्ध नसल्यास या धान्याचे गोदामातून वितरण करताना गोदामपालांनी गोदामातून ‘एससीएम’ प्रणालीमध्ये ज्या महिन्यांचा विकल्प ई-पॉस मशीनवर उपलब्ध आहे. त्या महिन्यांच्या धान्याची नोंद घ्यावी.

स्वस्त धान्य दुकानदारांनी त्याप्रमाणे स्टॉक करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करावे.  तालुक्यात ऑगस्टचे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व पीएम गरीब कल्याण योजनेचे वाटप करण्यासाठी ई-पॉस मशीनला विकल्प उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार सप्टेंबर, डिसेंबर महिन्यांचे विक्रीचे विकल्प ई-पॉस मशीनला उपलब्ध आहेत.  त्यानुसार 26 डिसेंबरमध्ये स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध धान्य सप्टेंबर व डिसेंबर करता वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. सप्टेंबरचा डेटा ई-पॉस मशीनवर दिसत नसल्याने व सप्टेंबरचे काही वाटप होऊन, काही लाभार्थ्यांना धान्य वाटप बाकी असल्याने ज्या लाभार्थ्यांचे सप्टेंबरचे वाट बाकी आहे, त्यांना फक्त नोव्हेंबरच्या पर्यायामधून सप्टेंबरचे धान्य वाटप करण्यास परवानगी देण्यात आल्याचे तहसीलदार अवळकंठे यांनी सांगितले.

 

आदेशाप्रमाणे ज्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे सप्टेंबरचे वाटप शिल्लक आहे किंवा काही लाभार्थी वाटपाचे बाकी आहेत. फक्त त्या शिल्लक लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबरच्या पर्यायांमधून पावत्या काढाव्यात. कोणत्याही परिस्थितीत इतर लाभार्थ्यांना नोव्हेंबरच्या पर्यायातून धान्य वाटप करू नये.
                                            -शिवकुमार आवळकंठे,  तहसीलदार, पारनेर.

Back to top button