पदवीधर निवडणूक : निवडणूक कामांत हलगर्जीपणा केल्यास कारवाई : जिल्हाधिकारी डॉ. भोसले | पुढारी

पदवीधर निवडणूक : निवडणूक कामांत हलगर्जीपणा केल्यास कारवाई : जिल्हाधिकारी डॉ. भोसले

नगर : पुढारी वृत्तसेवा : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली. या आचारसंहितेचे जिल्हयात काटेकोर पालन होईल, या दृष्टीने नियोजन करत निवडणूक विषयक कामे वेळेत व जबाबदारीने पार पाडा. निवडणूक कामांत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना दिला आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निवडणूक कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, सर्व उपजिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी जिल्हयात एकूण 147 मतदान केंद्र आहेत. या केंद्रावर मतदारांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचार्‍यांच्या नियुक्या करण्यात आलेल्या आहेत.

Back to top button