नगर : टँकरमधून गॅस चोरी करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

नगर : टँकरमधून गॅस चोरी करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश
Published on
Updated on

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  टँकरमधून अवैधरित्या गॅस काढून टाक्यांमध्ये गॅस भरणारे चोरीचे रॅकेट नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या पथकाने रंगेहात पकडून उघड केले. संगमनेर- कोपरगाव रोडवर जेऊर कुंभारी शिवारात यु. पी. हरियाणा राजस्थानी हॉटेलसमोर मोकळ्या जागेत ही कारवाई (दि.3 जानेवारी) रोजी रात्री 12ः30 वाजता करण्यात आली हे विशेष!
या छाप्यात कॅप्सूल अशोक लेलंड कंपनीच्या टँकरसह (क्र.एम.एच.43 बी. जी. 7150) दुसरा याच कंपनीचा तर अन्य कंपनींचे लहान वाहन (क्र. एम. एच. 11 सी. एच. 4480) व गॅसच्या 30 टाक्या असा सुमारे 27 लाख 97,718 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
बुधाराम आनंदाराम विष्णोई (वय 40 वर्षे) याच्यासह (राजस्थान, ह. मु. जेऊर कुंभारी, ता. कोपरगाव) येथील 5 आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात पो. ह. शकील अहमद शेख (नाशिक) यांनी गुन्हा दाखल केला.

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी परिक्षेत्रातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकाने (दि.3 जानेवारी) रोजी रात्री 12ः30 वाजता कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत संगमनेर- कोपरगाव रोडवर जेऊर कुंभारी शिवारात यु. पी. हरियाणा राजस्थानी हॉटेलसमोर मोकळ्या जागेत आरोपी बुधाराम आनंदाराम विष्णोई (वय 40 वर्षे, रा. जम्भसागर, भीवासार, जोधपुरा, राजस्थान, हल्ली रा. यु. पी. हरियाणा राजस्थानी ढाबा, जेऊर कुंभारी शिवार, ता. कोपरगाव, जि. अ.नगर), प्रकाश भगीरथराम विष्णोई (वय 35 वर्षे, रा. भिनासर, ता. फलोडी, जि. जोधपूर, राजस्थान, हल्ली रा. यु. पी. हरियाणा राजस्थानी ढाबा, जेऊरकुंभारी शिवार) भुराराम कोजाराम जानी (वय 26 वर्षे, रा. भरजासार, ता. फलोदी, जि. जोधपूर, राजस्थान, हल्ली रा.जेऊर कुंभारी शिवार) तसेच (एम.एच.11 सी.एच. 4480 दोस्त चारचाकीचा चालक धर्मेंद्रकुमार वचानु विंद (वय 27 वर्षे, रा. विंद, ता. किरकत, जि.जोनपूर , उत्तरप्रदेश, जेऊर कुंभारी शिवार, गॅस टँकर (क्र. एम.एच. 43 बी.जी. 7150) चा चालक सुखराम मगन्ताराम विष्णोई (रा. राजस्थान, पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांनी संगनमत करुन हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीतून मुंबई येथून एलपीजी गॅसने भरलले टँकर (कॅप्सूल) वाहनाचा चालक गॅसची डिलेव्हरी करण्यास जात असताना गॅस भरलेले टँकर कंपनीने नेमुन दिलेल्या डेपोवर डिलेव्हरीसाठी घेवुन न जाता यातील काही गॅसची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी टँकरमधुन गैरकायदेशीररित्या गॅसचे सिलेंडर भरण्याचे साधने वापरून ज्वालाग्रही गॅस आवश्यक खबरदारी न घेता अवैधरित्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरुन, तो साठवताना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईत 27 लाख 97, 718 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या चोरीबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाणे येथे जीवनावश्यक (अत्यावश्यक) वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील तहसीलदार विजय बोरुडे, कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व अंमलदारांनी यशस्वी केली.

पोलिस रॅकेटमधील सहभागींच्या मागावर !

कोपरगाव पोलिसांच्या हद्दीत नाशिक पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे गॅस चोरीच्या या रॅकेटमध्ये कोण- कोण सहभागी आहेत, त्याचा पोलिस तपास करीत पोलिसांची पावले आता त्यांच्या मागावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news