संगमनेर : ‘आ. बाळासाहेब थोरात यांच्यामुळे रस्त्याला निधी’ | पुढारी

संगमनेर : ‘आ. बाळासाहेब थोरात यांच्यामुळे रस्त्याला निधी’

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नियो जनातू 3 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. थोरात म्हणाले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकासकामांचा वेग कायम आहे.

तालुका हा विस्ताराने मोठा असून तालुक्यातील 171 गावे व 250 च्या पुढे वाड्यावस्ती आहेत. विविध गावांमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या विविध कामांमधून जिल्हा वार्षिक योजना 2022- 23 मधून ग्रामीण रस्ते विकास आणि मजबुतीकरण अंतर्गत विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांना 3 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मिळवला आहे.

या अंतर्गत चिंचपूर मळई वस्ती ते प्रतापूर, निमगाव जाळी रस्ता, पांढरी रस्ता ते मांची हिल, घुलेवाडी एकता चौक ते साई श्रद्धा चौक, गुंजाळवाडी आरगडे मळा गेट ते गुंजाळवाडी चौफुली, मंगळापूर कासार दुमाला रस्ता, करमाळा रस्ता, कौठे धांदरफळ क्षीरसागर मळा ते सांगवी, सारोळे पठार, धारवडवाडी, माळेगाव पठार, कौठे बु. ते पौसावाडी, चिंचोली गुरव, वामानवाडी, बोडकेवाडी तळेगाव रस्ता, निमगाव खुर्द ते काशाई मंदिर, रायतेवाडी तनपुरे वस्ती ते दिघे वस्ती, मोरदरा, पेमगिरी येलूशी वाडी रस्ता, खांडगाव ते ग्रामीण रस्ता 157, सावरचोळ ते चंदगड, मनोली ते शिंदे वस्ती, निमोण- कर्‍हे, तळेगाव ते घोडमाळ- देवकवठे, घुलेवाडी ते खांजापूर, सायखिंडी रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग, सोनेवाडी ते मालदाड या रस्त्यांचे मजबुतीकरण, खडीकरण, डांबरीकरण यासाठी या कामांसाठी एकूण 3 कोटी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

आ. बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केलेली ही कामे तातडीने सुरू होणार असल्याने, निमगाव जाळी, मांची हिल आदी गावातीलग्रामस्थांनी थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

Back to top button