

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील चार जणांविरोधात लग्नाचे अमिष दाखवित शिर्डी येथे एका लॉजमध्ये व शेतामध्ये अत्याचार, जाती वाचक शिविगाळ व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सागर ऊर्फ सुखदेव नंदू पवार, संदीप नंदू पवार, सुखदेव नंदू पवार यांची आई, स्वप्नील पवार (रा. माहेगाव, ता. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. एका महिलेकडून अत्याचार व अॅट्रासिटीचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. सागर पवार याने संबंधित तरूणीला लग्नाचे अमिष दाखवित लॉज व स्वतःच्या शेतामध्ये नेत अत्याचार केला.
तरूणीने लग्नाची मागणी घातल्यानंतर सागरच्या कुटुंबियांनी जातीवाचक शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. राहुरी पोलिस ठाण्यामध्ये सागर याने अत्याचार केला. कुटुंबियांनी जातीवाचक शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याने अॅट्रोसिटीचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.