नगर : साकुर येथील सामाजिक कार्यकर्त्यास घाटात अडवून केला प्राणघातक हल्ला

नगर : साकुर येथील सामाजिक कार्यकर्त्यास घाटात अडवून केला प्राणघातक हल्ला
Published on
Updated on

संगमनेर: पुढारी वृत्तसेवा :  बोलेरो आणि एक स्विप्ट या दोन वाहनातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी साकुर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या डोक्यात गजाने लाठ्यांनी, गजाने, तांबिन ,लाठ्या,उलट्या कोयत्याने प्राणघातक हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसानी १६ जणांच्या विरोधात प्राणघातक हल्ला या कलमाखाली गुन्हा दाखल केला असून ३ जणांना अटक केली आहे.  याबाबत घारगाव पोलिसांकडून समज लेली अधिक माहिती अशी की, साकुर येथे शुक्रवारी सकाळी ग्रामसभेत जोगे पठार या लोक वस्तीवरील पाणी प्रश्न प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यांस जाब विचारला असता त्याचा राग अनावर झाल्याने माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शंकर खेमनर यांनी प्रश्न विचारणाऱ्या सुनील इघे याला पाहून तुझा प्रश्न विचारण्याचा काही संबंध नाही असे उद्गार काढले.

त्यावर 'मी वैयक्तिक प्रश्न विचारत नाही तर जनतेच्या हिताचा प्रश्न विचारत आहे' असे म्हटल्याचा राग आल्याने संगमनेर बाजार समितीचे माजी सभापती शंकर हनुमंत खेमनर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित अशोक खेमनर यांच्यासह अनमोल शंकर खेमनर, हर्षद शंकर खेमनर, रफिक अब्दुल चौगुले आबा वाकचौरे, गणपत पवार ग्रामसेवक नागेश पाबळे यांनी इघे यास शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली. तसेच तू जर आमच्या विरुध्द आवाज उठविला तर तुला कायमचा संपवून टाकेन अशी धमकी इघे यास दिली त्यानंतर सुनील घेणे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील ८ जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

घारगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून सुनील इघे, बिलाल सजन शेखआणि प्रभाकर सुखदेव कदम हे तिघे जण पुन्हा माघारी साकुरकडे हिवरगाव पठार मार्गे धुमाळवाडी गावचे पुढे घाट माथ्यावर आले असता अचानक पाठीमागून बोलेरो व स्विफ्ट या दोन वाहनांतून मधूनआलेल्या २० ते २५ जणांनी सुनील ईघे यांची गाडी ओळखून मोटर सायकल वर गाडी चढवत सुजित अशोक खेमनर याने इघेच्या डोक्यावर रिवॉल्व्हर लावत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच अनमोल शंकर खेमनर,आबा वाकचौरे, बाजी राव सतू खेमनर,संतोष धोंडिभाऊ खेमनर उमेश अशोक गाडेकर,गणपतबाळासाहेब पवार,किशोर बापू गाडेकर,रफिक सिकं दर चौघुले, भागवत सुभाष शेंडगे, लखन सुभाष शेंडगे, बालम सुलेमान पटेल, दत्ता त्रय सुभाष रेनुकादास, फिरोज सरदार पटेल,सुधीर फटांगरे,कल्पेश गडगे सर्व रा सर्व साकुर यांनी सुनील इघे याच्या डोक्यामध्ये गजाने लाठ्या. काठ्या,लोखंडी टामी व कोयत्याने बेदम मारहाण करत प्राण घातक हल्ला चढवित त्यास जखमी केले.

तसेच दीड तोळ्यांची चैन ,२८ हजार रोख रक्कम लंपास केली. सुजित खेमनर आणि अनमोल खेमनर यास पोलिस येण्याची खबर मिळताच इघे याच्या तोंडात काहीतरी विषारी औषध टाकून त्याच्या, मोटर सायकलवर दगड टाकून फरार झाले. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात सुनील इघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील १६ जणांच्या विरोधात प्राणघातक हल्ला या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस करत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news