

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोठला येथील कुरेशी हॉटेलमध्ये अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा हॉटेल व्यवसायाकरीता वापर करणार्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी छापा आकून सिलेंडरचा साठा जप्त केला.
या कारवाईत घरगुती वापराच्या दहा सिलेंडरच्या टाक्या असा 29 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सिकंदर कलीम सय्यद (रा. गाडळकर मळा), समीर बाबुलाल कुरेशी (रा. व्यापारी मोहला, नालबंद खुंट) या दोघांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सिकंदर कलीम सय्यद याला पोलिसांनी ताब्यात घेतले.