नगर : चंदनाच्या झाडांची विठे गावातून चोरी | पुढारी

नगर : चंदनाच्या झाडांची विठे गावातून चोरी

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील विठे येथील प्रतिशील शेतकरी विजय डेरे यांच्या शेतात पुन्हा एकदा चंदन चोरी झाली.
बुधवारी रात्री झालेल्या या चोरीत सुमारे 1 लाखाहून अधिक रकमेच्या चंदनाची चोरी झाली असल्याचा दावा विजय डेरे यांनी केला आहे. चोरट्यांनी काही झाडांच्या मध्ये घाव घालून त्यातील चंदन काढून घेतले तर काही उभी झाडे तोडून त्याच्या गाभ्यातील चंदन चोरून नेले.
डेरे यांनी विठे येथील आपल्या क्षेत्रातील स.नं .51 मध्ये चंदनाच्या झाडांची लागवड केली आहे.

त्यांचे मोठे बंधू तथा वृक्षमित्र रमाकांत डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली या झाडांची देखभाल करत त्यांनी ही झाडे मोठी केली. झाडे मोठी झाली की रात्रीच्या वेळी चंदन चोर या झाडांची चोरी करत असतात. आतापर्यंत सहा वेळा या ठिकाणी चंदन तस्करांनी डल्ला मारत चंदनाच्या झाडांची चोरी केली.

तक्रारीचा उपायोग नाही

तक्रार करूनही याची दखल घेतली जात नाही आणि दखल घेतली गेली तरी या चोरांना पकडण्यात आले नाही. एकूण चंदन चोरांचा तपास लागत नसल्याची खंत विजय डेरे यांनी व्यक्त केली. एकीकडे शासन चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे मात्र चंदनाच्या झाडांची चोरी करणार्‍या या चोरांना पकडून त्यांना धडा शिकवणे अपेक्षित असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Back to top button