नगर : दुभाजकावर आदळून कंटेनर उलटला | पुढारी

नगर : दुभाजकावर आदळून कंटेनर उलटला

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :   नेवासा फाटा येथील सावतानगरकडे जाणार्‍या रस्त्याच्या समोर औरंगाबादहून-नगरकडे जाणारा मालवाहतूक कंटेनर रस्ता दुभाजकावर आदळून उलटला. त्यामुळे कंटेनरमधील मालाचे रिकामे खोके रस्त्यावर पडून महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. ही घटना बुधवारी मध्यरात्री बारा वाजता घडली. औरंगाबादहून-नगरच्या दिशेने चाललेला कंटेनर नेवासा फाटा येथे रात्री बारा वाजता रस्ता दुभाजकावर चढल्यामुळे कंटेनरमधील रिकामे खोके रस्त्यावर पडले.

त्यामुळे मध्यराञी महामार्गावर वाहतूक विस्कळत झाली. सुदैवाने मध्यरात्री हा मालवाहू कंटेनर रस्ता दुभाजकावर चढूनही दैवबलवत्तर म्हणून इतर वाहने अथवा चालकालाही काही इज्जा झाली नव्हती.  प्रसंगवधान राखत व्यावसायिक व कार्यकर्त्यांच्या मदतीने काहीकाळ एकेरी वाहतूक वळवून रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आला.

Back to top button