नगर : रस्त्याचे निकृष्ट काम पाडले बंद

नगर : रस्त्याचे निकृष्ट काम पाडले बंद

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील उक्कडगाव ते मांडवे रस्ता व प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत मंजूर दशमी गव्हाण- उक्कडगाव-सांडवे या दोन्ही रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी होईपर्यंत पुढील काम न करण्याची भूमिका घेत भाजप तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांच्यासह ग्रामस्थांनी कामे बंद पाडली. उक्कडगाव, मांडवे, दशमीगव्हाण व सांडवे रस्त्यावरील ग्रामस्थांची गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही रस्त्यांच्या कामाबद्दल तक्रारी होत्या. ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देऊन दोन वर्षांचा कालावधी उलटून गेलेला असताना रस्त्याचे कामे अद्यापि पूर्णत्वास गेली नाहीत.

तसेच आत्तापर्यंत झालेले काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांची होती. त्याच मागणीचा विचार करीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दोन्ही कामांची चौकशी करण्याची मागणी केली. याबाबत पालकमंत्री विखे यांनी तत्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. पालकमंत्री विखे यांनी दोन्ही कामांची चौकशी करण्याचे आदेश देताच ठेकेदारांनी अधिकार्‍यांच्या संगनमताने काम उरकून घेण्याची घाई केली. हे लक्षात येताच भाजप तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, मांडव्याचे सरपंच सुभाष निमसे, दशमीगव्हाणचे सरपंच बाबासाहेब काळे यांच्यासह ग्रामस्थांनी काम बंद पाडले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news