सत्ता नसताना मिळविला सर्वांत जास्त निधी ; आमदार रोहित पवार ठरले अव्वल | पुढारी

सत्ता नसताना मिळविला सर्वांत जास्त निधी ; आमदार रोहित पवार ठरले अव्वल

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्ता नसतानाही कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यात आमदार रोहित पवार अव्वल ठरले आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करून घेतली आहेत. जामखेड येथे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय स्थापन होण्यासाठी आमदार पवार यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. सदर कामास महाविकास आघाडी सरकारच्या काळात 27 जून 2022 रोजी प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली होती.

या इमारतीच्या कामास डिसेंबर 2022 च्या पुरवणी अर्थसंकल्पात 1 कोटी 71 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.यासोबतच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मार्च 2022 मध्ये मंजूर असलेल्या नाबार्ड योजनेअंतर्गत रस्ते व पुलाच्या कामांसाठीचा उर्वरित निधी तिसर्‍या टप्प्यातील तरतूद 6 कोटी 37 लाख रुपये, जुलै 2021 व मार्च 2022 या कालावधीत मंजूर असलेल्या कर्जत येथील 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व कर्मचारी निवासस्थाने, तसेच जामखेड येथील 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व कर्मचारी निवासस्थाने आदी इमारतींसाठी 4 कोटी रुपये, अशा नवीन व जुन्या कामांना मिळून एकूण 12 कोटी 7 लाख रुपये एवढा भरघोस निधी प्राप्त झाला आहे.
यापूर्वी पावसाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात 15 कोटींचा निधी आमदार पवार यांनी मंजूर करून घेतला होता.

150 कोटींचे प्रस्ताव मंत्रालयात

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत महाविकास आघाडी सरकार असताना कर्जत व जामखेडचे 150 कोटींचे प्रस्ताव मंत्रालयात पाठवले होते. तेही टप्प्याटप्प्याने मंजूर होतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

खा.विखे, आ.शिंदेंमुळे 8 कोटी

याबरोबरच खासदार सुजय विखे यांच्या मागणीनुसार कर्जत व जामखेड तालुक्यात 5 कोटींचे रस्ते व आमदार राम शिंदे यांच्या मागणीनुसार कर्जत व जामखेड तालुक्यात 3 कोटी रुपयांची रस्ते मंजूर झाले आहेत.

Back to top button