पारनेर : प्रभारी मुख्याध्यापकाची मान्यता रद्द करा | पुढारी

पारनेर : प्रभारी मुख्याध्यापकाची मान्यता रद्द करा

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जामगाव येथील ग्री.एम.पी. हायस्कूल येथील मुख्याध्यापक पदोन्नती मान्यता ही बेकायदेशीर कागदपत्र दस्तऐवजा आधारित केलेली असून, प्रभारी मुख्याध्यापक पदोन्नती मान्यता तातडीने रद्द करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे महात्मा फुले जनजागृती युवक क्रीडा संस्कार मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी केली आहे.
अर्जामध्ये म्हटले की, वादग्रस्त संस्थेचे ग्री.एम.पी. हायस्कूलमधील प्रभारी मुख्याध्यापकपदी सेवानिवृत्त झाल्यानंतर तेथे सेवा ज्येष्ठता डावलून कनिष्ठ शिक्षक काशिनाथ फंड यांना प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहण्यासाठी त्यांचे बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर मान्यता दिली आहे.

फंड या शिक्षकावर यापूर्वी राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी कारवाई माध्यमिक शिक्षण विभागाने प्रलंबित ठेवली आहे. कोरोना कालावधीत या शिक्षकाने बनावट व्यवस्थापन आधारे संगनमतांनी इमारतीचे सागवान, लाकूड, शालेय फर्निचर, कपाटे, लोखंडी पत्रे, लोखंडी पाईप, शालेय परिसरातील फळे व अन्य झाडे तोडून या संस्था शाळेची जंगम मालमत्ता विक्री-विल्हेवाट लावून शाळा संस्था व शासनाचे नुकसान केले. त्यांच्यावर धर्मादाय आयुक्तांकडे, तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय, नगर वन विभाग, पारनेर पोलिस ठाण्यात चोरी, अपहर प्रकरणी फिर्याद दाखल आहे.

शाळेत बनावट व्यवस्थापकांनी शासनाची भरती बंदी असताना बेकारीशीर दोन शिक्षक, कर्मचारी, लिपिकव शिपाई, असे चार कर्मचारी भरती करून एक शिक्षक कर्मचार्‍यास भ्रष्ट मार्गाने प्रभारी मुख्याध्यापक मान्यता दिली आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षण अधिकारी व वरिष्ठ सहायक कर्मचारी या सर्वांमध्ये सामील आहेत, असा आरोप मंडळाकडून करण्यात आला आहे. या अर्जावर अध्यक्ष बाळासाहेब माळी, सचिव राजेंद्र नाईक यांच्या सह्या आहेत.

संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी
गैर प्रकरणात सामील सर्वांवर कायदेशीर कारवाई होऊन शासकीय रक्कम वसूल व्हावी, बेकायदेशीर प्रभारी अधिकार तातडीने रद्द होऊन सेवा ज्येष्ठता प्रमाणे मुख्याध्यापकपदाची मान्यता मिळावी, शाळा, विद्यार्थी शासनाच्या हिताचा विचार होऊन या प्रकरणी तातडीने आदेश मिळावे, कायदा सुव्यवस्थेचे रक्षण व्हावे, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणार्‍या सर्व संबंधितावर कायदेशीर कारवाई व्हावी, असे बाळासाहेब माळी यांनी म्हंटले आहे.

Back to top button