नगर : पहिले स्रीशिक्षिका साहित्य संमेलन ; स्त्रीशिक्षिका व साहित्यिकांना विविध पुरस्कार जाहीर | पुढारी

नगर : पहिले स्रीशिक्षिका साहित्य संमेलन ; स्त्रीशिक्षिका व साहित्यिकांना विविध पुरस्कार जाहीर

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने येत्या 3 जानेवारी रोजी होणार्‍या पहिल्या स्रीशिक्षिका साहित्य संमेलनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यविषयक योगदान देणार्‍या स्त्री शिक्षिका व साहित्यिकाना देण्यात येणार्‍या विविध पुरस्कारांची घोषणा स्वागताध्यक्ष राजेंन्द्र फाळके, निमंत्रक,आमदार रोहित पवार व संयोजक प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी केली.

विविध पुरस्कार असे : सावित्रीबाई फुले पुरस्कार स्नेहल बाळसराफ (तळेगाव-दाभाडे), फातिमा शेख पुरस्कार जास्मिन रमजान शेख (मिरज), ताराबाई शिंदे पुरस्कार. सुरेखा अशोक बोर्‍हाडे (नाशिक), डॉ.रखमाबाई राऊत पुरस्कार डॉ. संगीता बर्वे (पुणे), मुक्ता साळवे पुरस्कार डॉ. प्रतिभा जाधव (लासलगाव), लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्कार डॉ. वृषाली मगदूम (मुंबई), दुर्गा भागवत पुरस्कार सरिता सदाशिव पवार (वरवडे-कणकवली), नजूबाई गावित पुरस्कार सुनीता भोसले (शिरूर), गेल ऑम्वेट पुरस्कार बालिका ज्ञानदेव (लोणंद), बाया कर्वे पुरस्कार डॉ. शुभांगी गादेगावकर (ठाणे), भूमिकन्या पुरस्कार स्वाती पाटील. अशा एकूण अकरा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

पुरस्कार निवड समितीचे सदस्य म्हणून डॉ. सुधाकर शेलार, डॉ. महेबूब शेख, डॉ. संजय बोरुडे, डॉ. संतोष पद्माकर पवार यांनी काम पाहिले. दि. 3 जानेवारी रोजी होणार्‍या उद्घाटन सत्रात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. याप्रसंगी संमेलनाचे उद्घाटक खासदार सुप्रिया सुळे, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे, प्रमुख पाहुणे म्हणून रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल मीनाताई जगधने, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, शिक्षण विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड, तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, राजेंद्र निंबाळकर, . बप्पाजी धांडे, सुभाषचंद्र तनपुरे उपस्थित राहणार आहेत.

Back to top button