कांदा बाजारभावात तेजी…! घोडेगाव बाजार समितीत 2300 रुपये उच्चांकी भाव | पुढारी

कांदा बाजारभावात तेजी...! घोडेगाव बाजार समितीत 2300 रुपये उच्चांकी भाव

घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यापासून कांद्याची आवक कमी झाली, त्यामुळे बाहेरील मागणी वाढल्याने आता भावातही वाढ होतानाचे दिलासादायक चित्र आहे. काल घोडेगाव बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला जास्तीत जास्त 2300 रुपयांप्रमाणे भाव मिळाल्याचे पहायला मिळाले.  नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती उपआवार घोडेगाव येथे सोमवार दि. 19 डिसेंबर 2022 रोजी 25 हजार 14 गोणी कांद्याची आवक झाली होती. सोमवारी कांद्याचे बाजार वाढले असून, लिलावात कांदा 200 रुपयांपासून 2300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री झाला. मागील कांदा लिलावाच्या तुलनेत 200 रुपयांपर्यंत वाढ झाली.

घोडेगाव मार्केटमध्ये एकूण 135 ट्रक आवक आली होती. आवक कमी व मागणी वाढल्यामुळे भाव वाढल्याचे दिसून आले. नवीन लाल कांद्याची 3280 गोणी आवक झाली होती लाल कांद्यास 800 रुपयांपासून 2200 रुपयांपर्यंत दर मिळाला तर जुना उन्हाळी कांद्यास 200 रुपयांपासून 2300 रुपयांपर्यंत दर मिळाला.  दरम्यान, अनेक शेतकर्‍यांनी कांदा चाळीत साठवलेला आहे. आता भावात सुधारणा होऊ लागल्याने ज्यांच्याकडे कांदा शिल्लक आहे, त्या शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसांडून वाहताना दिसणार आहे.

नवीन लाल कांदा

गोल्टीः 800 ते 1000
गोल्टाः 1200 ते 1500
मुक्कल भारीः 1600 ते 1900
मोठा कलर पत्तिवालाः 2100
एक दोन लॉटः 2200 ते 2600

उन्हाळी गावरान कांदा

एक दोन लॉटः 2400 ते 2700
मोठा कलर पत्तीवाला ः 2250
मुक्कल भारीः 1100 ते 1900
गोल्टा ः 700- ते 1200
गोल्टी ः 300 ते 900
जोडः 300 ते 400
हलका डॅमेज कांदाः 200 ते 400

Back to top button