संगमनेर : उपमुख्यमंत्र्यांनी मोर्चाऐवजी जनतेच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे द्यावी : आ थोरात | पुढारी

संगमनेर : उपमुख्यमंत्र्यांनी मोर्चाऐवजी जनतेच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे द्यावी : आ थोरात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या मोर्चावर टीका करण्याऐवजी जनतेच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे दिली असती तर ते योग्य झाले असते असं विधान माजी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते, आ बाळासाहेब थोरात यांनी केलं. संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात येत असणारे जन्मगाव असलेल्या जोर्वे गावात पत्नी कांचन थोरात, मुलगी जयश्री थोरात यांच्यासह येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. थोरात म्हणाले की महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी  या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येत महामोर्चा काढला होता.  त्या महामोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाटिपण्णी केली. त्यांच्या पद्धतीने त्यांनी मोर्चा कसा फसला, हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्या मूलभूत प्रश्नांवर मोर्चा काढण्यातआला. त्यास कुठेही त्यांनी स्पर्श केला नाही.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य मी ऐकले. सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बोलतात, महाराष्ट्राची अवहेलना करतात. त्यावर फडणवीस हे एक शब्दही बोलले नाहीत. महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्य भारतीय जनता पक्षाकडून आहेत. महागाई, बेरोजगारी त्यावर देखील ते बोललेले नाही. महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेला महामोर्चा प्रचंड होता, तो लोकांनी, सर्वांनी पाहिला. मोर्चाला उत्स्फूर्तपणे लोक आलेले होते. असेही आ थोरात यावेळी म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणूक या गाव पात ळी वरील निवडणुका असतात त्यामुळे त्यात कुठलाही पक्ष नसतो त्या पक्ष विर हित असतात त्यामुळे प्रत्येक मतदानाने या निवडणुकीत आपला मतदानाचाहक्क बजावा या निवडणुका पक्ष विरहित अस ल्या तरी संगमनेर तालुक्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून चांगले कामकेले आहे त्यामुळे बहुतेक ग्रामपंचायतींवरती काँग्रेसचे नक्कीच वर्चस्व येईल असेत्यांनी सांगितले

Back to top button