जामखेड : वशिल्यावर उमेदवारी नाहीच ! आ. शिंदे

जामखेड : वशिल्यावर उमेदवारी नाहीच ! आ. शिंदे
Published on
Updated on

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : जामखेड बाजार समिती निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार आहे. विरोधातील असंख्य कार्यकर्ते आपल्या संपर्कात आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन पुढील रणनिती ठरवण्यात येईल, ही निवडणुक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. गावोगावच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत आपली सर्व ताकद आपल्या उमेदवारांच्या पाठीशी लावावी. या निवडणुकीत आपल्या पॅनलकडून तगडे उमेदवार दिले जाणार आहेत. उमेदवार निवडताना कोणाचाही वशिला चालणार नाही, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले.

जामखेड बाजार समिती निवडणुकीसाठी भाजपा सज्ज झाली आहे. निवडणुकीच्या नियोजनासाठी आमदार राम शिंदे यांनी भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची चोंडी येथील निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. या बैठकीत निवडणुकीचे गणित मांडण्यात आले. बाजार समितीसाठी सक्षम उमेदवारालाच उमेदवारी द्यावी,असा सूर या बैठकीत निघाला.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अजय दादा काशिद, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, आप्पासाहेब ढगे, उदयसिंग पवार, प्रविण चोरडिया, डॉ. अल्ताफ शेख, आप्पासाहेब ढगे, प्रविण चोरडिया,बिट्टु मोरे, डॉ.गणेश जगताप, गौतम कोल्हे, राम पवार, वैभव कार्ले, अजय सातव, राहुल चोरगे, गणेश शिंदे, बाजीराव गोपाळघरे, तुकाराम कुमटकर, हर्षल बांगर, महारुद्र महारणवर, मच्छिंद्र गिते, संदीप जायभाय, तान्हाजी फुंदे, भरत उगले, लहू शिंदे, पांडुरंग उबाळे, बापुराव ढवळे, सोमनाथ पाचरणे, डॉ. बाळासाहेब बोराटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news