नेवासा फाटा येथील जागा हडप करणारे दोघे अटकेत | पुढारी

नेवासा फाटा येथील जागा हडप करणारे दोघे अटकेत

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा फाटा येथील 35 गुंठे जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 7 जणांसह अन्य पाच अनोळखी इसमांविरूध्द नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी दोघा जणांना बुधवारी रात्री अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने हजर केले असता, 17 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  मुजफ्फर राजू शेख व प्रवीण संतोष साळवे (दोघे रा.नेवासा फाटा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नेवाशातील ज्ञानेश्वर वसंत घुले यांनी याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.

दि. 14 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर  दरम्यान या दोघांसह अन्य लोकांनी खोटी चतु:सिमा दस्तऐवज तयार करुन घेऊन त्यांच्या गट क्रमांक 13 गटापैकी पुनवर्सन जमीन व 1988 तहसील बिगरशेती जमिनी मधील 0.35 आर क्षेत्र हडपण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ करुन धमकावत जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचे घुले यांनी फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार नेवासा पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत असून, पोलिस निरीक्षक विजय करे तपास करीत आहेत.

Back to top button