कोपरगाव : अ‍ॅट्रॉसिटीतील पसार आरोपीस अखेर अटक | पुढारी

कोपरगाव : अ‍ॅट्रॉसिटीतील पसार आरोपीस अखेर अटक

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  खुनासहीत अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चार महिन्यांपासून फरार असलेला आरोपी गणेश शंकर गावंड (वय 33 वर्षे रा. मंजुर ता. कोपरगाव) यास तालुका पोलिसांनी शिताफिने जेरबंद केले आहे. तालुका पोलिस ठाण्यात आरोपी गणेश शंकर गावंड (वय 33, रा. मंजूर ता. कोपरगाव) हा गुन्हा घडले पासून स्वतःला अटकेपासून वाचविण्यासाठी फरार झालेला होता. सदर घटनेकडे संपुर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष होते.

सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना, उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी विभाग संजय सातव यांना गुप्त बातमीदारामार्फत फरार आरोपी गणेश शंकर गावंड हा कोपरगाव तालुका व लगतचे सिन्नर भागात जात असल्याची माहीती मिळाल्याने, त्याचा पोलिस पथकामार्फत शोध घेतला असता, सदरहू गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश शंकर गावंड हा मिळून आला आहे. सदरची कामगिरी तालुका पोलिस ठाण्याचे पो. हे. कॉ. इरफान शेख, पो. ना. कृष्णा कुर्‍हे करीत आहेत.

Back to top button