पुणतांबा : रेल्वेस थांबाच नसल्याने पुणतांबे जंक्शन कशाला ? संतप्त ग्रामस्थांचा सवाल | पुढारी

 पुणतांबा : रेल्वेस थांबाच नसल्याने पुणतांबे जंक्शन कशाला ? संतप्त ग्रामस्थांचा सवाल

 पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : शिर्डी रेल्वे मार्गामुळे साधारण दहा वर्षांपुर्वी पुणतांबा स्थानकाला जंक्शनचा दर्जा मिळाला. त्यामुळे या ठिकाणी जलद रेल्वे गाड्यांना थांबे देण्यात आले, परंतु सद्य स्थितीला जलद गाड्यांचे थांबे बंद करण्यात आल्याने या जंक्शनचा उपयोग काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांसह प्रवासी करीत आहेत.  पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्गासाठी शेतकर्‍यांनी आपल्या सोन्यासारख्या जमिनी कवडीमोल भावात दिल्या आहेत. त्यावेळी शिर्डी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असलेल्या तिर्थक्षेत्रासाठी रेल्वे होती.

मार्गामुळे पुणतांबा तिर्थक्षेत्राचा विकास होऊन दळणवळण व भाविकांची गर्दी वाढल्यानंतर बेरोजगारी कमी होईल, नवीन उद्योगधंदे निर्माण होतील, सर्व रेल्वे गाड्यांना येथे थांबा मिळेल व शिर्डीसाठी शटल रेल्वेसेवा सुरू केली जाईल, अशी ग्रामस्थांसह शेतकर्‍यांना आशा लागली होती. तसे आश्वासनेही देण्यात आली मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांत जलद गाड्यांना नाहीच परंतु, पुर्वी थांबणार्‍या गाड्यांचे थांबेही बंद झाल्याने मोठी गैरसोय होत आहे.  शिर्डी रेल्वेमार्ग व जंक्शनचा गावाला फायदा व विकास काय झाला, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. पुणतांबा येथे उड्डाणपूल की, भुयारी मार्ग याबाबत निर्णय नाही

Back to top button