संगमनेर : 18 ग्रा.पं, 75 सदस्य बिनविरोध! डोळासने, सायखिंडीचे सरपंच बिनविरोध | पुढारी

संगमनेर : 18 ग्रा.पं, 75 सदस्य बिनविरोध! डोळासने, सायखिंडीचे सरपंच बिनविरोध

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. डोळासणे ग्रामपंचायतच्या मंगल बाळासाहेब काकड तर सायखिंडी ग्रामपंचायतच्या निलम अमोल पारधी यांची बिनविरोध निवड झाली. 18 ग्रामपंचायतींचे 75 सदस्य बिनविरोध झाले.
उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी सर्वाधिक कोळवाडे ग्रामपंचायतीमध्ये 9 सदस्य, सायखिंडी 8, खराडी, करूले आणि निंबाळे प्रत्येकी 7, वाघापूर 6, डोळासणे व निळवंडे प्रत्येकी 5, पिंपरणे 4, कर्जुले पठार व वरझडी खुर्द प्रत्येकी 3, रणखांब, रहिमपूर व दरेवाडी प्रत्येकी 2 सदस्य, घुलेवाडी, जांभुळवाडी, धांदरफळ बुद्रुक आणि सादतपूर या चार ग्रामपंचायतीचे प्रत्येकी 1 असे एकूण 75 ग्रामपंचायतींचे सदस्य बिनविरोध निवडून आले.

तालुक्यातील 18 ग्रामपंचायत मधील बिनविरोध निवडलेले सदस्यः डोळासने ग्रामपंचायत सरपंच मंगल बाळासाहेब काकड, सदस्य- रवींद्र लक्ष्मण लोहोकरे, संगीता नंदकुमार बांबळे,नंदाताई बाळासाहेब काकड, विमल नाना मिसाळ. सायखिंडी ग्रामपंचायत सरपंच निलम अमोल पारधी, सदस्य माजी उपसरपंच शशिकांत आत्माराम गांडोळे, अनिता अरुण नन्नवरे, दीपक मोहन करंजकर, वैशाली नवनाथ जेडगुले, राजश्री राधाकिसन शिंदे, अर्चना वामन पारधी, कविता संजय ताजनपुरे, सखाहरी रानबा गुळवे हे सदस्य बिनविरोध निवडून आले.

खराडी ग्रामपंचायतीत कावेरी निलेश पवार, मंगल नानाभाऊ चत्तर, सोनाली देविदास वाघ, बजरंग पांडुरंग माळी, बेबी सुभाष साबळे अक्षय कांतीलाल पवार, प्रियंका ईश्वर पवार. वाघापूर ग्रामपंचायतः संगीता नुकूल बांगर, सीता कोंडाजी शिंदे, उल्हास मारुती जाधव, सविताताई शिवाजी शिंदे, शारदा रतन आव्हाड, आबासाहेब खंडू शिंदे.

जांभुळवाडी ग्रामपंचायतः देऊबाई त्रंबक खेमनर. रणखांब ग्रामपंचायतः प्रशांत राजेंद्र गुळवे, सनाबाई परशुराम जाधव. दरेवाडी ग्रामपंचायतः मिनाबाई रामदास पवार, दत्तू अण्णा गायकवाड. कर्जुले पठार ग्रामपंचायतः संतोष अंकुश दुधवडे, सुनिता रोहिदास गुंजाळ, अलका विक्रम पडवळ.

पिंपरणेः धनंजय सदाशिव वाकचौरे, कोमल नवनाथ मरभळ, अर्चना सुधीर रोहम, शैला मंजाबापू साळवे.
निंबाळे ग्रामपंचायतः खतीब बाबू शेख, कमल लहानु गायकवाड, शहाजान वसीम शेख, इशा सर्जेराव पर्बत, सचिन दगडू पर्बत, संपतराव मधुकर पर्बत, संगीता दत्तात्रय पर्बत.

कोळवाडे ग्रामपंचायतः रूपाली दत्तू नेहे, सुनिता मधुकर गोंदे, बाबुराव जानकु गोंदे, रामा सगा मडके, सिंधू राजेंद्र काळे, भाग्यश्री शिवराम घोडे, मंगल अशोक कुदळ, विलास मुरलीधर गुंजाळ, दत्तात्रय हरिभाऊ तारडे.

666 उमेदवार निवडणूक रिंगणात..!
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होत आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 251 तर सदस्य पदासाठी 1325 अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाच्या 140 जणांनी तर सदस्यपदाच्या 542 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यामुळे आता सरपंचपदाच्या 35 जागांसाठी 93 तर सदस्य पदाच्या 367 जागांसाठी 666 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Back to top button