घोडेगावच्या बाजारात कांदा 2300 रुपयांपर्यंत | पुढारी

घोडेगावच्या बाजारात कांदा 2300 रुपयांपर्यंत

घोडेगाव; पुढारी वृत्तसेवा : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारात कालच्या लिलावासाठी 55 हजार 398 कांदा गोण्यांची आवक झाली, लिलावामध्ये जुना उन्हाळी कांदा 200 रुपयांपासून 1700 रुपयांपर्यंत विक्री झाला, तर नवीन लाल कांदा 800 रुपयांपासून 2300 रुपयांपर्यंत विक्री झाला. मागील आठवड्याच्या तुलनेत कालच्या लिलावात कांदा दरात घसरण झाली. जुन्या उन्हाळ कांद्याच्या तुलनेत नवीन लाल कांद्यास मागणी अधिक आहे, यामुळे नवीन कांद्यास दर अधिक मिळत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली होती. त्यामुळे त्याचा परिणाम लिलाव पडल्याचे पाहायला मिळाले. अनेक शेतकर्‍यांनी कांदा साठवणूक केली आहे. मात्र बाजारभाव पडल्याने शेतकरी चिंतेत होते. आता घोडेगावात बाजारभावात सुधारणा दिसल्याने पुन्हा एकदा कांदा चाळीत ठेवलेल्या शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

काय निघाले बाजारभाव
घोडेगाव येथील कांदा लिलावात सरासरी 1300 ते 1500 रुपये, मुक्कल भारी-1100 ते 1200 रुपये, गोल्टा 700 ते 950 रुपये, गोल्टी -500 ते 700 रुपये, जोड-300 ते 300 रुपये, हलका डॅमेज कांदा- 200 ते 400 रुपये, एक दोन लॉट -1600 ते 1700 रुपये, नवीन लाल कांद्याची 4 हजार 583 गोण्या कांदा आवक झाली. यात गोल्टी-800 ते 1000 रुपये, गोल्टी मध्यम 1200 ते 1400 रुपये, मुक्कल भारी-1600 ते 1900 रुपये, मोठा कलर पत्तिवाला- 2100 ते 2200 रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.

 

Back to top button