चापडगावच्या विठ्ठल मंदिराचे कलशारोहण ; मंदिरावर हॅलिकॉप्टरने पुष्पवृष्टी | पुढारी

चापडगावच्या विठ्ठल मंदिराचे कलशारोहण ; मंदिरावर हॅलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील चापडगावचे ग्रामदैवत विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कलशारोहण सोहळा गोविंद महाराज शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंदिरावर हॅलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी विठू नामाचा गजर करत जयघोष केला. या जय घोषाने वातावरण चैतन्यमय बनले होते.नगर-सोलापूर महामार्गावरील चापडगाव आहे. येथील ग्रामस्थांनी भक्तांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी लोकसहभागातून केली आहे. कलशारोहण सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. कलशारोहण सोहळ्यानिमित्ताने कलशाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच दिंडी सोहळ्याचे आयोजन केले. या सोेहळ्याचा मान गावच्या लेकींना देण्यात आला. लेकींचा सन्मानही करण्यात आला. प्रकाश शिंदे युवा मंच व विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीतर्फे मंदिरावर हॅलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी चापडगावचे सुपुत्र व ठाणे शहर पोलिसचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. मंदीर परिसरात सभामंडप, आखीव रेखीव शिखर, पेव्हर ब्लॉक आदी कामे करण्यात आली आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमास आमदार राम शिंदे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, कैलास शेवाळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, औंदूबर निंबाळकर, अशोक देवकर, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, बापूसाहेब नेटके, भाजपचे कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, पप्पू धोदाड आदे उपस्थित होते. चापडगाव येथे पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, माध्यमिक विद्यालयाची इमारत उभारणीनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी केली. ही सर्व कामे पूर्ण झाली, याचे मोठे समाधान आहे यामध्ये आमदार राम शिंदेंचे मोठे योगदान आहे, असे प्रकाश शिंदे यांनी सांगितले.

Back to top button