नेवासा : दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात; एक ठार | पुढारी

नेवासा : दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात; एक ठार

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  उड्डाणपूलावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकल्यानंतर उड्डाणपूलावरून खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवार दि.8 रोजी दुपारी धुळे- सोलापूर हायवेवरील धाराशिव कारखाना उड्डाणपुलावर घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संदीप कारभारी धाडगे (रा. गोंडेगाव ता. नेवासा (वय 37 वर्ष) हा पत्नी अंजलीसह दुचाकीवरून मुरूम येथील नातेवाईकांकडे जात होता. ही दुचाकी धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळा येडशीच्या दरम्यान असलेल्या धाराशीव साखर कारखाना उड्डाणपुलावर आली असता, नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळली व दुचाकी उड्डाणपुलावरून खाली कोसळली.

या भीषण अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नीच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच येरमाळा ठाण्याचे सपोनि दिनकर गोरे, पोलिस कर्मचारी मुकुंद गिरी, किरण शिंदे, कदम आदींनी घटनास्थळी भेट देऊन ओळख निष्पन्न केली. या प्रकरणी येरमाळा पोलिसांनी नेवासा पोलिस ठाण्यात फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी उस्मानाबाद येथे जाऊन उत्तरीय तपासणीनतंर मृतदेह गोंडेगाव येथे आणण्यात आला. शुक्रवारी दुपारी शोकाकुल वातारणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत संदीपच्या मागे पत्नी,तीन मुली,भाऊ असा परिवार आहे.

Back to top button