शिर्डी : राष्ट्रवादी कार्यालयास आग

शिर्डी : राष्ट्रवादी कार्यालयास आग

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  शिर्डीतील अत्यंत गजबजलेल्या पांडुरंग नगरच्या कमानी जवळ असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे कार्यालय मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आगीत भस्मसात झाले.  शिर्डी शहरातील अत्यंत गजबजलेल्या भागातील पांडुरंगनगर भागातील व नवीन पिंपळवाडी रस्त्यालगत असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय कार्यालयाला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती.

अचानकपणे आगीचे लोळ येऊ लागले. परिसरात प्रचंड धूर दिसू लागले. त्यामुळे एकच धावपळ उडाली.  शिर्डी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत नवीन पिंपळवाडी रोड काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. तर महावितरणने तात्काळ वीज खंडित केली होती. मात्र त्या कार्यालया शेजारील नागरिकांनी काही काळासाठी धास्ती धरली होती. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी लवकरच आग आटोक्यात आणली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news