नगर तालुक्यातील 21 अर्ज झाले बाद; सरपंचपदाचे 7 व सदस्यपदांच्या 14 अर्जांचा समावेश | पुढारी

नगर तालुक्यातील 21 अर्ज झाले बाद; सरपंचपदाचे 7 व सदस्यपदांच्या 14 अर्जांचा समावेश

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात सरपंचपदाचे 7 तर सदस्यपदांचे 14 असे एकूण 21 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. सरपंचपदाचे साकत येथील 2, वाळकी येथील 1 व राळेगण येथील दोन अर्ज बाद झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास प्रारंभ झाला असून, बुधवारी निवडणूक रिंगणातीलउमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. वाळकी, नेप्ती, सारोळा कासार यासह तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. 2 डिसेंबर या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले.तालुक्यात सरपंचपदासाठी एकूण 180 तर सदस्यपदासाठी 862 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी नगर तहसील कार्यालयात ग्रामपंचायतीनिहाय अर्जांची छाननी करण्यात आली. सरपंचपदासाठी दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी 173 अर्ज वैध ठरले असून, 7 अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये वाळकी येथील 1, राळेगण 2, खातगाव टाकळी 1, साकत 2, कौंडगाव जांब येथील 1 अर्जाचा समावेश आहे.

ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी दाखल झालेल्या 862 पैकी 848 अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. 14 अर्ज मात्र बाद झाले आहेत. यामध्ये वाळी ग्रामपंचायतीमधील 2, नेप्ती 1, राणेगण 1, सारोळा कासार 1, टाकळी खातगाव 1, वडगाव तांदळी 1, आठवड 1, खातगाव टाकळी 1, साकत 3 व कौंडगाव जाँब येथील 2 अर्जाचा समावेश आहे.

नगर तहसील कार्यालयात तहसीलदार उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली छाननी करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार बारवकर व इतर अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

वैध अर्ज कंसात सरपंचपदाची संख्या
वाळकी 64 (5), नेप्ती 56 (10), कापूरवाडी 40 (9), नांदगाव 25 (8), राळेगण 41 (6), सारोळा कासार 41 (6), शेंडी 51 (10), जखणगाव 22 (9), नारायणडोहो 55 (12), सोनेवाडी चास 25 (3), टाकळी खातगाव 40 (5), वडगाव तांदळी 20 (6), आठवड 29 (5), आगडगाव 27 (4), खातगाव टाकळी 41 (6), कौडगाव जांब 35 (7), बाबुर्डी बेंद 21 (3), मदडगाव 14 (5), पांगरमल 15 (7), पिंपळगाव कौंडा 20 (6), पिंपळगाव लांडगा 20 (5), राजणी 37 (7), साकत 26 (6), सारोळा बध्दी 12 (6), सोनवाडी पिला 17 (5), उक्कडगाव 28 (5), दहिगाव 26 (7).

सात तालुक्यांतील बाद अर्जांची संख्या
अकोले तालुक्यातील सदस्यपदाचे 5, श्रीरामपूर तालुक्यातील सरपंचपदाचे 1, पारनेर तालुक्यातील 9 सदस्य व 2 सरपंचपदाचे, पाथर्डी तालुक्यातील 1 सरपंच व 8 सदस्यपदाचे, राहुरी तालुक्यातील 9 सदस्य व 2 सरपंचपदाचे अर्ज बाद झाले. संगमनेर तालुक्यातील 33 सदस्य व 4 सरपंचपदाचे तर श्रीगोंदा तालुक्यातील 6 सदस्यपदाचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत.

Back to top button