नगर : अवैध धंद्यांसाठी आंदोलनाचे इशारे ! पालकमंत्री विखे यांचा नाव न घेता आमदार लंकेंना टोला | पुढारी

नगर : अवैध धंद्यांसाठी आंदोलनाचे इशारे ! पालकमंत्री विखे यांचा नाव न घेता आमदार लंकेंना टोला

नगर : पुढारी वृत्तसेवा : महामार्ग तसेच इमारती व इतर सार्वजनिक विकास कामे कोणत्याही प्रकारे थांबणार नाहीत. याचे योग्य नियोजन करा, असे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. खडी, वाळू यामुळे कोणतेही जिल्ह्यातील कोणतेही सरकारी कामे ठप्प नाही. मात्र, आंदोलनाचे इशारे देणार्‍यांचे अवैध धंदे बंद होत आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचे साधने देखील बंद होणार असल्याचे शल्य मोठे आहे. त्यामुळे ते आता आंदोलनाचे इशारे देत असल्याची टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी नाव न घेता आमदार नीलेश लंके यांच्यावर केली आहे. महसूलमंत्री तथा पालकमंत्री विखे पाटील यांनी रविवारी आढावा बैठक तसेच जनता दरबार झाल्यानंतर ी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक मुंढे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांची उपस्थिती होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोणतेही विकास कामे खडी वा वाळूअभावी बंद नाहीत. गेल्या आठवड्यात निळवंडे धरणाचे कालवे सुरु करण्यासाठी सूचना केल्या आहेत. सरकारी कामे करण्यासाठी ज्यांना खडी व इतर गौणखनिज लागते. त्यांना नक्की किती ब्रास लागेल ते निश्चित करा. त्यानंतर संबंधित प्रातांधिकारी यांना भेटून ते उपलब्ध करा. त्यासाठी आवश्यक त्या अटी व शर्ती पूर्ण करा, असे आदेश दिलेले आहेत. असे त्यांनी सांगितले.

खडी व वाळूअभावी महामार्गाचे काम बंद आहे. यासाठी 7 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकप्रतिनिधींनी आंदोलनाचा इशारा दिला, याकडे पालकमंत्री विखे यांचे लक्ष वेधले असता, विखेे पाटील म्हणाले की, कामे ठप्प नाहीत. त्यासाठी काही नियमावली तयार केली आहेत. आतापर्यंत नियमबाह्य व बेकायदेशीर कामे सुरु होती. या कामांच्या माध्यमातून बगलबच्च्यांना सांभाळण्याचे काम सुरु होते.
आता ते काम बंद होणार असल्याने काहींना दुःख झाले. त्यामुळे त्यांनी आता आंदोलनाचे इशारे देणे सुरु केले.

हे आंदोलन जनतेच्या हिताचे नसून, त्यांचे माफियांचे संबंध उघडले होत आहेत. उत्पन्नाचे साधन बंद होत आहे. त्यामुळे त्यांचे आंदोलनाचे इशारा सुरु असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी नाव न घेतला आमदार नीलेश लंके यांच्यावर टीका केली. विखे पाटील म्हणाले, गेल्या काही दिवसापासून लंपीचा प्रादुर्भाव कमी झाला असून आतापर्यंत 2 हजार 800 जनावरे दगावली आहेत. दगावलेल्या 1400 जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक मदत दिली आहे. उर्वरित मदत लवकरच वाट होईल, असे त्यांनी सांगितले.

यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुसान झाले. नुकसानीपोटी जिल्ह्यात 950 कोटी रुपयांची मदत वाटप करावी लागणार आहे. या मदतीबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वृत्तपत्रांत नाव येण्यासाठी काहींना सवय जडली

गौण खनिजाअभावी कोट्यवधींची शासकीय विकासकामे ठप्प झाली आहेत. असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. याकडे पालकमंत्री विखे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आमदार पवार यांनी कोणत्या परिस्थितीवर काय भाष्य केले मला माहित नाही. मात्र, स्वत:चे नाव वृत्तपत्रांमध्ये सातत्याने यावे, असे वाटते. अशा व्यक्तींना माध्यमांशी बोलण्याची सवय झाली आहे. तर काहींची फॅशन झाली आहे. असा टोला पालकमंत्री विखे पाटील यांनी लगावला आहे.

Back to top button