अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू | पुढारी

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर शहराजवळील खांडगाव फाटा पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. मृत बिबट्या मार्गावर पडून होता. ही बाब सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ यांच्या निदर्शनाखाली त्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली माहिती मिळाली. वन परिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी तातडीने घटनास्थळी आले. वनविभागाच्या अधिकारी आणि कर्म चार्‍यांनी मृत बिबट्याला संगमनेर खुर्द येथील रोपवाटिकेमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या डॉ. वर्षा शिंदे यांनी त्या बिबट्याचे शविच्छेदन केले. त्याच ठिकाणी मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किती बिबट्यांचा बळी?

सध्या सर्वत्र ऊसतोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बिबट्यांचा निवाराच कमी होत असल्याने हे बिबटे मानवी वस्तीकडे चाल करीत आहे, असे असले तरी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अनेक बिबट्यांना यापूर्वीही आपले जीव गमवावे लागले आहेत. वन विभागाचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने आणखी बिबट्यांचे बळी जाणार, हा खरा प्रश्न आहे.

Back to top button