जवळा : सांगवीसूर्यात बैलगाडा शर्यतीचा थरार | पुढारी

जवळा : सांगवीसूर्यात बैलगाडा शर्यतीचा थरार

जवळा : पुढारी वृत्तसेवा :  पारनेर तालुक्यातील सांगवीसूर्या येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानल्या जाणार्‍या पीरसाहेब यात्रेची सुरवात मोठ्या उत्साहात सुरवात झाली. सांगवी सूर्या व परिसरातील एक जागृत देवस्थान म्हणून या पीरसाहेब दर्ग्याची ख्याती आहे. हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेऊन आपले दरवर्षी केलेले नवस फेडून कृतज्ञता व्यक्त करतात.

काल सुरू झालेल्या यात्रेस सांगवी ग्रामस्थांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. सुमारे दीडशेहून अधिक गाडा मालकांनी सहभाग घेतला. यात्रेत खाऊगल्ली, पाळणे, छोटे-मोठे व्यावसायिकांनीही दुकाने थाटली होती. त्यामुळे दोन तीन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा भरली नव्हती. परंतु या वर्षी यात्रेला चांगला ग्रामस्थांचा व यात्रेकरूंचा उत्साह दिसत होता. रात्री नागरिकांच्या मनोरंजनासाठी रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले दि 3 डिसेंबर रोजी जंगी कुस्त्यांच्या हगाम्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे.

Back to top button