राहुरीत तीन जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल | पुढारी

राहुरीत तीन जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालूक्यातील चिंचोली येथे पती, पत्नी व आई मंदिरात दर्शनासाठी जात असताना त्यांना मंदिरात जाण्यास मज्जाव करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच कुर्‍हाड, खोरे व लाथा बूक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना (दि. 1) रोजी सायंकाळी घडली. शरद बाळू भोसले (वय 29, रा. चिंचोली, ता. राहुरी) याने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शरद भोसले, त्याची आई शांताबाई व पत्नी मनिषा हे तीघे दिनांक एक डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चिंचोली गावचे शिवारातील बिरोबा मंदीरामध्ये दर्शनासाठी जात होते.

त्यावेळी आरोपींनी त्यांना जातीवाचक शब्द वापरून ‘तुमची लायकी नाही, मंदीरामध्ये यायची. तुम्ही पुन्हा मंदीरात यायचे नाही,’ असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावेळी शरद भोसले हा त्यांना म्हणाला की, ‘तुम्ही आम्हाला शिवीगाळ करु नका,’ असे म्हणाल्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी शरद भोसले आणि त्यांची पत्नी व आई अशा तिघांना कुर्‍हाड, खोरे व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच ‘तुम्ही पुन्हा विरोबाच्या मंदीरात दर्शनासाठी आलातर तुम्हाला ठेचून काढू,’ अशी धमकी दिली.

शरद बाळू भोसले याच्या फिर्यादीवरून आरोपी सुर्यभान बाबूराव काळे, संजय सुर्यभान काळे व कुसुमबाई सुर्यभान काळे (सर्व रा. चिंचोली, ता. राहुरी) या तिघांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम नूसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके हे करीत आहेत. त्यांना राहुरी पोलिस सहकार्य करीत आहेत.

Back to top button