कोपरगाव : पाटपाणी अर्ज भरण्यास डिसेंबरपर्यंत मुदतवाढ : माजी आ.स्नेहलता कोल्हेंची माहिती | पुढारी

कोपरगाव : पाटपाणी अर्ज भरण्यास डिसेंबरपर्यंत मुदतवाढ : माजी आ.स्नेहलता कोल्हेंची माहिती

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : गोदावरी कालवे रब्बी हंगाम पाटपाणी नियोजनासाठी नमुना नंबर 7 पाणी मागणी अर्ज 30 डिसेंबर पर्यंत भरून द्यावे, असे जाहिर प्रकटन नाशिक पाटबंधारे विभागाने प्रसिध्द केले आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी मुदतीत पाणी मागणी अर्ज भरावेत, असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.

बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यांची सध्या रब्बी हंगामासाठीच्या शेती मशागतीची कामे सुरू असल्याने नाशिक पाटबंधारे विभागाने नमुना नंबर 7 वर पाणी मागणी अर्ज 30 नोव्हेंबर पर्यंत सादर करावे म्हणून प्रकटन प्रसिध्द केले होते. त्यास मुदतवाढ मिळावी म्हणून आपण पत्रान्वये मागणी केली होती. त्यास कार्यकारी अभियंता सागर शिंदे व उपकार्यकारी अभियंता सु. का. मिसाळ यांनी 30 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असुन त्याबाबतचे पत्र गोदावरी उजवा व डावा कालवा उपविभाग व शाखा कार्यालयांना पाठविले आहे.

तरी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेवुन नमुना नंबर 7 वर पाणी मागणी नोंदवावी. गोदावरी कालवे सल्लागार समितीची बैठक निश्चित करून बारमाही गोदावरी कालवे सिंचन पाटपाणी आर्वतनांत येणार्‍या अडचणी दूर कराव्यात, याबाबतही कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याशी चर्चा केली असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

 

Back to top button