ऑनलाईन उमेदवारी अर्ज डोकेदुखी; धिम्या वेबसाईटने ग्रा. पं निवडणुकीपासून वंचित राहण्याची भीती | पुढारी

ऑनलाईन उमेदवारी अर्ज डोकेदुखी; धिम्या वेबसाईटने ग्रा. पं निवडणुकीपासून वंचित राहण्याची भीती

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकांची वेबसाईट धिम्या गतीने चालत असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यास लागणारा विलंब पाहता अनेक इच्छुकांना ग्रामपंचायत निवडणुकीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यासाठी सोमवार, दि.28 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे.

उमेदवारीस लागणारी कागदपत्रे जमा करताना त्यांची दमछाक होताना दिसते. त्यातच ऑनलाईन अर्ज भरण्याची सक्ती असल्याने सेतू कार्यालयात रीघ लागली असून, या निवडणुकांची संगणक वेबसाईट अगदी धिम्या गतीने चालत आहे. त्यामुळे एक अर्ज ऑनलाईन होण्यास तीन ते चार तास लागतात.

हा विलंब पाहता काही इच्छुक रात्री उशिरापर्यंत शहरात थांबतात तरीही त्यांच्या अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने अनेकांना आपण निवडणुकीतून वंचित राहतो कि काय अशी भीती निर्माण झाली असून, अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस बाकी आहेत. या काळात शासनाने ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे . दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्‍या दिवसापर्यंत 12 ग्रामपंचायत निवडणुकीस सरपंचपदासाठी 14, तर सदस्यासाठी 56 असे एकूण 70 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

गावनिहाय उमेदवारी अर्ज असेः अमरापूर- सरपंच – आशाताई गरड, सदस्य – निरंक, वाघोली – सरपंच – सुस्मिता भालसिंग, सदस्य – राजेंद्र जमधडे (2), कल्पना भालसिंग, पाडूंरंग भालसिंग, गोरक्ष दातीर, निर्मला दातीर, नलाबाई आल्हाट, सुकदेव शेळके, लता शेळके, मोहन गवळी, बुधवारी 3, खानापूर ः सरपंच – शितल थोरात, दुर्गा थोरात, सगिंता थोरात, सदस्य-दीपाली दळे, मंगल गोबरे, विजय थोरात, योगेश चेडे, बाबासाहेब भागवत, द्वारका भागवत, तात्यासाहेब थोरात, प्रतिभा थोरात, गणेश पातकळ, ज्ञानदेव थोरात, बुधवारी 8, रांजणी ः सरपंच – भगवान चव्हाण, बुधवारी 2, सदस्य ः भगवान चव्हाण, आखेगाव ः सरपंच ः अयोध्या काटे, सदस्य ः नानाभाऊ पायघन, तारामती गोर्डे, सुरेखा काटे, मालन फुलमाळी, अश्विनी खंडागळे, अमोल खर्चन, बुधवारी 5, खामगाव सरपंच – बुधवारी 1 अर्ज, सदस्य-जैलूनामाबी पटेल, मीराबाई घोलप, गिताबाई बडधे, दिगंबर बडधे, वाजेद पटेल व बुधवारी 5 अर्ज, रावतळे कुरुडगाव सरपंच-चंद्रकला कवडे, सदस्यः तुकाराम औटी बुधवारी 2 अर्ज, सुलतानपूर खुर्द सरपंच-सदस्य निरंक दहिगाव ने सरपंच – बुधवारी 1, सदस्य -1, भायगाव सरपंच – बुधवारी 2, सदस्य ः 3, प्रभूवाडगाव सरपंच -सदस्य – निरंक, जोहरापूर सरपंच -सदस्य – निरंक

Back to top button