नगर : परवानगी कोविड सेंटरची, चालविले हॉस्पिटल!

नगर : परवानगी कोविड सेंटरची, चालविले हॉस्पिटल!
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात कोविड सेंटर व हॉस्पिटला परवानगी देण्याचे अधिकार फक्त महापालिका आयुक्तांना असताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी शहरातील डॉक्टरांना नियमबाह्य पद्धतीने कोविड सेंटर चालविण्याच्या परवानग्या दिल्या. तसेच, कोविड सेंटर चालविण्याची परवानगी असताना तीव्र लक्षणे असणार्‍या कोविड रुग्णावर उपचार करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

कोरोना काळात हाताबाहेबर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने 29 एप्रिल 2020 मध्ये कोविड उपचार केंद्र स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महानगरपालिका क्षेत्रात कोविड उपचार केंद्राला परवानगी देण्याचे अधिकारी फक्त आयुक्त यांना देण्यात आले असतानाही वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.बोरगे यांनी अन्य डॉक्टरांना हाताशी धरुन कोविड सेंटरला परवानग्या दिल्या. कोविड सेंटर चालविण्याची परवानगी दिलेल्या महाापालिका क्षेत्रातील 39 डॉक्टरांनी तीव्र लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांवर उपचार केले.

त्यामुळे संबंधित कोविड सेंटरमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक व कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती संदीप भांबरकर यांनी दिली. मात्र, इंडियन मेडिकल असोसिएशन, अहमदनगरकडून (आयएमए) दबाव तंत्राचा वापर केला जात असून तपासात अडथळा निर्माण करीत असल्याचे भांबरकर यांनी सांगितले. तसेच आरोग्य अधिकारी यांना वाचविण्यासाठी महापालिका आयुक्त पोलिस प्रशासनाला पुरावे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पैसे कमविण्यासाठी नियमबाह्य परवानग्या
आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या कोविड सेंटरच्या परवानग्या केवळ पैस कमविण्याच्या हेतूने होत्या. डॉक्टरांचे हॉस्पीटल ज्या ठिकाणी नाही अशा ठिकाणी संबंधित डॉक्टरच्या नावे परवानगी देऊन तीव्र लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे तक्रारी म्हटले आहे.

हायकोर्टात याचिका दाखल करणार
तक्रार दाखल केल्यानंतर कोतवाली पोलिसांकडून 39 डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र, आता पोलिसांवर दबाव असल्याने चौकशीला बे्रक लागला आहे. त्यामुळे चौकशी न झाल्यास हायकोर्टात धाव घेणार असल्याची माहिती भांबरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

म्हणूनच डॉ. बोरगे सक्तीच्या रजेवर
आरोग्य अधिकारी डॉ.बोरगे यांनी डॉक्टरचे शिक्षण, हॉस्पीटलमधील सेवा, सुविधा न पाहता कोविड उपचारासाठी परवानग्या दिल्या. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले होते. याच कारणामुळे तत्कालीन महापालिका आयुक्तांनी डॉ.बोरगे यांना 8 जून 2021 रोजी सक्तीच्या रजेवर पाठविले असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news