

नगर : सोशल मिडीयाचा अल्पवयीन मुलांवर मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येते. प्रेम हे आंधळ असत असे म्हणतात. त्याच आंधळ्या प्रेमापोटी गत वर्षात जिल्ह्यातील 390 मुलींनी घर सोडले. त्यातील 325 मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. त्यातील 65 मुली अजूनही पोलिस दप्तरी बेपत्ता आहेत. राज्यासह जिल्ह्यात अलीकडच्या चार ते पाच वर्षात मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्याची वेगवेगळी कारणे असली तरी मुख्य कारण प्रेमसंबधाचे आहे. त्यातून काही अघटित घटनांनाही घडल्या आहेत. शाळकरी वयामध्ये एखाद्या मुलाबरोबर प्रेम जडणे आणि त्या प्रेमाचे रूपांतर नंतर पळून जाण्यात होते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून परराज्यातील एखाद्या मुलाबरोबर प्रेम जडणे. प्रेमाच्या आणा, भाका घेणे नंतर घरातून निघून जाणे असेही कारणे असतात.
तर, कौटुंबिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थितीचे कारणे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून सन 2021 मध्ये 359 मुलींनी घरातून पलायन केले होते.
त्यापैकी 340 मुलींचा शोध लागला. 19 मुली बेपत्ता राहिल्या. 2022 मध्ये 462 मुलींनी घर सोडले होेते. त्यापैकी 414 मुलींची पुन्हा घर वापसी झाली. तर, 48 मुलींची अद्यापि शोध लागलेला नाही. बेपत्ता मुलीच्या शोधासाठी ऑपरेशन मुस्कान व विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी संशयिताचे नातेवाईकडे चौकशी सुरू असून मोबाईलद्वारे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, मुलींचे घरातून निघून जाण्याचे हे प्रकार चिंताजनक आहे.
वर्ष पळालेल्या मुली सापडलेल्या मुली बेपत्ता
2021 359 340 19
2022 462 414 48
2023 390 325 65