संगमनेर : थोरात साखर कारखान्याकडून 2500 उचल | पुढारी

संगमनेर : थोरात साखर कारखान्याकडून 2500 उचल

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी भावाची परंपरा कायम जपली आहे. सन 2022-23 या चालू हंगामा करीता पहिली उचल 2500 रुपये प्रतिटन जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ यांनी दिली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याने शेतकरी, सभासद, व कामगारांचे हित जोपासताना कायम उच्चांकी भाव दिला आहे.

मागील वर्षी सन 2021 -22 या हंगामामध्ये 15 लाख 53 हजार मे. टणाचे उच्चांकी गाळप केले आहे. याच बरोबर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्तेचा पुरस्कारही मिळालेला आहे. या सोबत दिवाळीमध्ये शेतकरी, कामगार, ऊस उत्पादक यांच्याकरिता कारखान्याने एकत्रित 26 कोटी रुपये बँकेत वर्ग केले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. याचबरो बर कामगारांना दिवाळीत 20% बोनसह 30 दिवसांचे सानुग्रह अनुदानही दिले आहे.

थोरात साखर कारखान्याने सातत्याने जिल्ह्यात एफआरपी पेक्षा जास्त भाव देताना यावर्षीही कार्यक्षेत्रातील व कार्य क्षेत्राच्या बाहेरील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिटन 2500 रुपये पहिली उचल कारखान्याने जाहीर केला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रासह सर्वत्र ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. ऊस हे शाश्वत उत्पादन देणारे पीक असून उत्पादन वाढी करता कारखान्याच्या वतीने विविध उप क्रम राबविण्यात येत आहेत. कारखान्याने उचल देण्याच्या ज्या धाडसी निर्णयाचे मार्गदर्शक आ. बाळासाहेब थोरात ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे शेतकरी व ऊस उत्पादकांनी अभिनंदन केले आहे.

Back to top button