धक्कादायक ! वीस वर्षीय तरुणीला मावशीनेच लोटले अनैतिक व्यवसायात | पुढारी

धक्कादायक ! वीस वर्षीय तरुणीला मावशीनेच लोटले अनैतिक व्यवसायात

राहाता : पुढारी वृत्तसेवा :  सख्ख्या मावशीसह मावशीच्या मैत्रिणीने आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या वीस वर्षीय तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध ग्राहकांशी शरीर संबंध करण्यासह वेश्या व्यवसायास भाग पाडले. मावशीच्या नात्याला काळीमा फासणारी ही खळबळ जनक घटना राहत्यात घडली आहे. याप्रकरणी राहाता पोलिसात पीडित मुलीच्या मावशीसह मावशीची मैत्रिणी व अन्य पाच पुरुष अशा 7 जणांविरुद्ध बलात्कार, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. यात वकिलासह हॉटेल मॅनेजरचा समावेश आहे.

राहाता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील वीस वर्षीय पीडित तरुणी वर्षाची असताना आईचे तर 10 वर्षाची असताना वडिलांचे निधन झाले. यानंतर पीडित मुलगी मध्यप्रदेशमधील इंदोर येथे राहणार्‍या सावत्र आईकडे गेली होती. तेथे सावत्र आईकडून त्रास होत असल्याने या पीडितेस मालेगाव येथील तिच्या मामाने पाच महिन्यांपूर्वी राहाता येथे तिच्या मावशीकडे आणून घातले होते. मावशी एका हॉटेलमध्ये कामास आहे.

पीडीतेस दि.1 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मावशीने शिर्डीला फिरायला जायचे, असे सांगून एका मैत्रिणी सोबत शिर्डी येथे नेले होते. तेथे मावशी पीडीतेस म्हणाली, ‘राहाता येथून एक व्यक्ती येणार आहे, तो तुला हॉटेलच्या रूममध्ये घेऊन जाईल, तेथे जो ते म्हणेल ते तुला करावे लागेल, जर तू तसे केले नाही तर मी तुला घरातून काढून देईल’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे ती घाबरली. 7:30 वा. वाजेच्या सुमारास कारमधून 54 वर्षे वयाच्या इसमाने पिडीतेला एका हॉटेलमध्ये नेले. पीडितेने प्रतिकार केला, तरी त्या व्यक्तीने मारहाण करून जबरीने संबंध केले. यानंतर पीडिता बेशुद्ध पडली होती. शुद्धीवर आल्यानंतर संबंधित इसमाने 9:30 वाजेच्या सुमारास तिला मावशी व मैत्रीणीजवळ आणून सोडले. जाताना त्याने काही पैसे मावशी व मैत्रिणीला काढून दिल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

मावशीने घरी आल्यानंतर, ‘तुला आता यापुढे असेच काम करावे लागेल. मी तुला आयते खाऊ घालणार नाही. आज घडले ते कुणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली . यानंतर चार-पाच दिवसांनी मावशीला एका इसमाचा फोन आला. त्याने 10 हजार रुपये देण्यास तयार आहे, असे सांगितले. यानंतर मावशीने दुचाकी गाडीवर आलेल्या माणसासोबत पिडितेला शिर्डी येथे काढून दिले. तेथे एका लॉजवर रूममध्ये इसमाजवळ रूम बंद करून सोडून दिले. त्यांनी सुद्धा शरीर संबंध ठेवले. तेथील मॅनेजरनेसुद्धा दहा- बारावेळा जबरीने संबंध केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राहाता पोलिसांनी मावशी, तिची मैत्रीण, वकील, मॅनेजर, पीडितेचा मावस भाऊ व अन्य दोघांवर गुन्हे दाखल केले.

Back to top button