कोपरगावलगत जुगार अड्ड्यावर छापा 23.35 लाखांचा मुद्देमाल जप्त; 28 जुगारी ताब्यात | पुढारी

कोपरगावलगत जुगार अड्ड्यावर छापा 23.35 लाखांचा मुद्देमाल जप्त; 28 जुगारी ताब्यात

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहरालगत टाकळी फाट्याजवळ जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी सुमारे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत, 28 जुगारींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, (दि. 23) रोजी सपोनि डी.एस. मुंडे, पोसई सोपान गोरे, सहा. फौजदार व्हि. जे. घोडेचौर, पोहवा बी. आर. फोलाने, पोना एस.एस. चौधरी, पोना बी. के. खरसे, पोना एल. सी. खोकले, पोकॉ. आर. पी. जाधव, वाय.ए.सातपुते, चालक पोहव यु.एम.गावडे, चालक पोहेकॉ सी.पी. कुसळकर (सर्व स्थानिक गुन्हे शाखा अ.नगर) हे सरकारी वाहनातून पो. नि. अनिल कटके यांच्या आदेशावरुन कोपरगाव तालुका व शहर पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी माहिती घेत होते.

टाकळी फाटा धोंडीबानगर येथे योगेश बन्सी मोरे याच्या इमारतीच्या टेरेसवर काही इसम पैशावर खेळला जाणारा तीन पत्त्यांचा तिरट नावाचा हार- जीतीचा जुगार खेळत आहेत, अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी, शिर्डी विभाग शिर्डी, शहर पो. नि. वासुदेव देसले यांना कळविले. सपोनि जाधव, पोना के.एल कुन्हे, कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोकाँ राम खारतोडे, जी.व्ही. काकडे असे व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी साईकॉर्नर येथे एकत्र आले. पंचासह पोलिस पथक इमारतीच्या टेरेसवर पोहचले असता, तीन ठिकाणी गोलाकार बसलेले इसम पत्ते खेळताना दिसले. प्रत्येकाच्या हातामध्ये जुगाराचे तीन पत्ते होते.

पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी शेखलाल शेख चाँद (वय 57 वर्षे, रा. चर्च रोड, कोपरगाव) शीतल सुभाष लोहाडे (वय 45 वर्षे, रा. सावतानगर, मालेगाव), विजय केदु निमसे (वय 45 वर्षे, रा. रमाबाईनगर मनमाड, नंदु पुजा नजन (वय 36 वर्षे, रा. बनरोड राहाता), इम्रान याकुब मोमीन (वय 39 वर्षे, रा. जमदाडे चौक, मनमाड), कलिम भिकन बागवान (वय 67 वर्षे, रा. इंदिरानगर, कोपरगाव) अप्पाक जमील शेख (वय 47 वर्षे, रा.शांतीनगर मनमाड), नितीन उत्तम शेजवळ (वय 36, रा. राजवाडा, लासलगाव, ता. निफाड), राहुल दिलीप पाराशेर (वय 34 वर्ष, रा. मनमाड) , नाना शबा डोळस (वय 63 वर्षे, रा. सुभाष नगर, कोपरगाव), शेख अमजद हाशम (वय 38 वर्षे, रा. खडकी, ता. कोपरगाव), गणेश विठ्ठल जेजुरकर (वय 31 वर्षे, रा. पानमळा, शिर्डी, ता. राहाता) , सोमनाथ बापु वाळके (वय 42 वर्षे, रा. लासलगाव) , अनिल देवराम खरात, (वय 46 वर्षे, रा. लासलगाव), सुरेश कुंडलिक सातभाई (वय 56 वर्षे, रा. येवला), कैलास अशोक मुंजळ (वय 39 वर्षे, रा. महादेव नगर, कोपरगाव), तुषार राजेंद्र दुशिंग( वय 28 वर्षे, रा. कोपरगाव) , योगेश मुकुंद रासकर (वय 34 वर्षे, रा. येवला ) दिपक रामदास उंबरे (वय 46 वर्षे, रा. येवला), मोहसीन कलंदर सय्यद (वय 32 वर्षे रा. सुराला, ता, वैजापूर), दिपक मायकल बनसोडे (वय 30 वर्षे, रा. स्वामी समर्थ नगर, वैजापूर) रविंद्र माधव सानप (वय 36 वर्षे, रा. येवला), हरिलाल फकिरा डांचे (वय 56 वर्षे, रा. संगमेश्वर, मालेगाव),सुदाम पंढरीनाथ नवले (वय 44 वर्षे, रा. तांभोळ, ता. अकोले), सुभाष लक्ष्मण चावडे, वय 38 वर्षे, रा. बाभुळवंडी, ता. अकोले), हरी दगडु करवर( वय- 42 वर्षे, बाभुळवंडी, ता. अकोले), विरेंद्र अरुणसिंग परदेशी (वय 45 वर्षे, रा. येवला), यूनुस इकबाल शेख( वय 36 वर्षे, रा. खडकी, ता. कोपरगाव) यांची पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली.

या सर्वांना कोपरगाव पोलिस स्टेशनला आणले. पोना शंकर चौधरी यांच्या फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुरजि नंबर 397/2022 म.जु.का.कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. नि. वासुदेव देसले व पोउपनि रोहिदास ठोंबरे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, शिर्डी उपविभागीय कार्यालयाचे पोलिस अधिकारी व कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकार्‍यांच्या संयुक्त पथकाने यशस्वी केली.

नगरसह नाशिक, औरंगाबाद जिल्ह्याचे जुगारी !

अ. नगरसह, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील जुगारींकडुन रोकड 2 लाख 5,670 रुपये, 1 लाख 89 हजार रुपयांचे विविध कंपनीचे 30 मोबाईल व 19 लाख 40 हजाराचे 4 चारचाकी , 7 दुचाकी वाहने व पत्ते असा एकुण 23 लाख 35,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Back to top button