घोडेगाव : आठवड्यात कांदा हजारांनी घसरला, दक्षिणेकडील राज्यात मागणी घटल्याने बाजारभाव झाला कमी

घोडेगाव : आठवड्यात कांदा हजारांनी घसरला, दक्षिणेकडील राज्यात मागणी घटल्याने बाजारभाव झाला कमी

घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा  :  कांद्याच्या दरात एका आठवड्यात एक हजार रुपयांनी घसरण बघायला मिळाली असून, नेवासा तालुक्यातील घोडेगाव बाजार समितीत 21 नोव्हेंबरला 225 ट्रक कांदा आवक झाली होती. लिलावमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात हजार रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले.  बाजार समितीमध्ये 41 हजार 803 कांदा गोणी आवक झाली होती. यात उन्हाळी कांदा सर्वाधिक होता. तीनशे गोणी नवीन लाल कांदा विक्रीसाठी आला होता. या कांद्यास पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. जुना उन्हाळी कांदा दोनशे ते दोन हजार रुपयांपर्यंत विक्री झाला. क्वचित एक दोन वक्कल 2100 ते 2200 रुपयांना विक्री झाली.

दक्षिणेकडील राज्यात नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असून, सोलापूर बाजार समितीत 30 ट्रकपर्यंत नवीन कांद्याची आवक होत असून, नोव्हेंबरमध्येही मध्यप्रदेश व महाराष्ट्रात जुना उन्हाळी कांदा अजूनही अधिक प्रमाणात उपलब्ध आहे.
शेतकर्‍यांकडे मोठा साठा असून, दक्षिणेकडून मागणी घटल्याने बाजार कमी होत असल्याचे बाजारभाव अभ्यासक सांगत आहेत. भाव घसरल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहेत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news