नगर : ऊस गळीत हंगामाने धरला जोर; साडेतेरा लाख साखर पोत्यांचे उत्पादन | पुढारी

नगर : ऊस गळीत हंगामाने धरला जोर; साडेतेरा लाख साखर पोत्यांचे उत्पादन

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगामाने जोर धरला असून, 18 कारखान्यांनी आतापर्यंत 16 लाख 79 हजार 698 मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून, एकूण 13 लाख 34 हजार 330 क्विंटल साखर पोते उत्पादित केले आहेत. साखर उतारा सरासरी 7.94 टक्के आहे. गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र जादा असल्यामुळे गळीत हंगाम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु होता.

यंदा देखील उसाचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत सहकार महर्षी कोल्हे, कर्मवीर काळे, अशोक, पदमश्री विखे पाटील, श्रीगोंदा, सहकार महर्षी थोरात, ज्ञानेश्वर, वृध्देश्वर, मुळा, अगस्ती, केदारेश्वर, कुकडी, अंबिका , गंगामाई, साईकृपा, प्रसाद, जयश्रीराम व युटेक या अठरा साखर कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे. या कारखान्यांची दररोजची गाळप क्षमता 98 हजार 750 मे.टन इतकी आहे.

19 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील अठरा कारखान्यांनी 16 लाख 79 हजार 698 मे.टन उसाचे गाळप करीत, 13 लाख 34 हजार 330 क्विंटल साखर उत्पादित केली आहे. आतापर्यंत उसाच्या गाळपात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे.
या कारखान्याने 1 लाख 66 हजार 460 टन गाळप केले असून, 1 लाख 45 हजार 370 क्विंटल साखर पोती निर्माण केली आहेत.

खासगी कारखान्यांची साडेचार लाख साखर पोती
11 सहकारी साखर कारखान्यांनी आतापर्यंत 11 लाख 47 हजार 433 टन उसाचे गाळप करुन, 8 लाख 95 हजार 75 साखर उत्पादित केले. 7 खासगी कारखान्यांनी 5 लाख 32 हजार 265 मे.टन उसाचे गाळप केले असून, 4 लाख 39 हजार 255 क्विंटल साखर पोती निर्माण केले आहेत.

कारखानानिहाय साखर पोती (कंसात उतारा)
सहकार महर्षी कोल्हे 59300, (8.73), कर्मवीर काळे 6400 (4.25), अशोक 71600 (8.53), पदमश्री विखे पाटील 78900 (6.96), श्रीगोंदा 92875 (8.05), सहकार महर्षी थोरात 145370( 8.73), ज्ञानेश्वर 133650 (8.14), वृध्देश्वर 61800 (8.36), मुळा 90000 (6), अगस्ती 48630 (8.37), केदारेश्वर 39000 (7.28), कुकडी 67550 (7.9)

Back to top button