श्रीरामपूर : सिनेटचे उद्या मतदान ; 125 नोंदणीकृत पदवीधर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार | पुढारी

श्रीरामपूर : सिनेटचे उद्या मतदान ; 125 नोंदणीकृत पदवीधर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधरांची अधीसभेच्या (सिनेट) सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी रविवार दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होत आहे. निवडून द्यावयाच्या एकूण 10 जागेसाठी सुमारे 37 उमेदवार रिंगणात उतरून आपले नशीब आजमावित आहेत. श्रीरामपूर तालुक्यात ग्रामीण भागात सुमारे सहाशे तेवीस तर शहर आणि उपनगरात अवघे 125 नोंदणीकृत पदवीधर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
दरम्यान यानंतर लगेचच नाशिक पदवीधर मतदार संघाची ही निवडणूक होणार आहे. यासाठी अलीकडेच मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला.

त्यात नगर जिल्ह्यात सुमारे 10 हजार पदवीधरांनी आपली नाव नोंदणी करून उच्चांक केला आहे, मात्र सिनेट साठी मतदान करणार्‍याsenate  पदवीधरांची संख्या ही अत्यल्प अशी आहे. सिनेटची नाव नोंदणी करण्यासाठी पुणे विद्यापीठाने जनजागृती केली नाही. यामुळे हजारो पदवीधर यापासून आजही वंचित राहिले आहेत. पदवीधरांनी पुणे विद्यापीठाच्या या संकुचित वृत्तीचा निषेध करीत याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

श्रीरामपूर शहर व तालुक्यात नोंदणीकृत पदवीधर मतदार शहरातील बोरावके महाविद्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या दरम्यान मतदान करतील. या निवडणुकीत एससी मतदार संघात रोहित कुचेकर, राहुल पाखरे, राहुल ससाने, संदीप शिंदे, शशिकांत तीकोटे , एसटी मतदार संघात एकूण 4 उमेदवार आहेत. त्यात देवराम चाटे, हेमंत कडले, गणपत नांगरे, विश्वनाथ पाडवी तर एनटी मतदारसंघात चार पदवीधर उमेदवार आहेत. त्यात अमोल खाडे, अजिंक्य पालकर, निलेश सानप, विजय सोनवणे आणि इतर मागासवर्गीय मतदार संघात निवड नुक लढविणर्‍यांमध्ये मयूर भुजबळ, सचिन गोर्डे, श्रीकृष्ण मुरकुटे,महेंद्र पठारे तर महिला मधून तबस्सुम इनामदार व बागेश्री माथलकर हे आमने-सामने लढत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर अधीसभा (सिनेट) निवडणूक गुपचूप उरकण्यात आली. याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मेलद्वारे तक्रार पाठवू, असे शफिक बागवान म्हणाले.

Back to top button